
प्रशासकीय कार्यालयांमध्ये महापुरुषांच्या जयंतीचा केवळ फार्स
सांगली /कडेगांव:-रिपोर्टर सागर मोहीते.
तालुक्यातील कडेपूर येथील टेंभू सिंचन व्यवस्थापन उप विभाग कार्यालयात अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची केवळ औपचारिकता करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून याबाबत जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केवळ एका साध्या खुर्चीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेऊन हार घालून जयंती साजरी करण्याचा केवळ फार्स करण्यात आल्याचे बोलले यावेळी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी हजर सुध्दा नव्हते असं प्रत्यक्ष दर्शीनी सांगितलं आहे. प्रतिमेला हार घालून त्याचा फोटो कार्यालयाच्या सोशल मिडिया ग्रुपवर टाकून जयंती आटोपण्यात आल्याचे सांगण्यात आले. राज्यातील सर्व शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयात शासन परिपत्रका प्रमाणे राष्ट्र पुरुष /थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्याचे सक्तीचे असताना काही कार्यालयात ह्या जयंती साजरा करण्याची केवळ औपचारिकता किंवा फार्स केला जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे आणि आताही सुरू आहे तर कित्येकदा काही कार्यालयात तर यापैकी एखादी जयंती सुट्टी दिवशी आली तर ती साजरी सुद्धा केली जात नाही त्यामुळं सरकारने किंवा शासनाने याबाबत कठोर निर्णय घ्यावेत अथवा हा फार्स बंद करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून व महापुरुष प्रेमी लोकांकडून होत आहे.
सन २०२५ मध्ये शासकीय /निमशासकीय कार्यालयात एकूण ४५ राष्ट्र पुरुष /थोर पुरुषांच्या जयंती साजरी करण्याबाबत २७ डिसेंबर २०२४ रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती मात्र कडेपूर येथील टेंभूच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत महाराजांच्या जयंतीची केवळ औपचारिकता पार पाडण्यात आल्याचे बोललं जात आहे. एक खुर्ची मांडून त्यावर महाराजांची प्रतिमा ठेऊन हार घालून फुले वाहण्यात आली. खुर्चीवर एखादी शाल किंवा स्वच्छ कापड ठेवावे किंवा फोटो एखाद्या सजवलेल्या टेबल वरती ठेवावा असे कोणालाही वाटले नसावे एवढेच काय तरी प्रत्यक्ष दर्शी सांगतात की यावेळी कार्यालयातील अधिकारी हजर सुध्दा नव्हते.
चौकट:-
टेंभू उपसा सिंचन व्यवस्थापन कडेपुर कार्यालयाचे सहाय्यक अभियंता नाईक हे उर्मट अधिकारी म्हणून परिचित आहेत. अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी ते कार्यालयात सुध्दा उपस्थित नव्हते हा महापुरुषांचा अपमान आहे आणि अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.
डी एस देशमुख
नेते पाणी संघर्ष चळवळ कडेगांव
चौकट:-
शासकीय कार्यालयात शासकीय आदेशाप्रमाणे महापुरुषांची जयंती साजरी होणे गरजेचे आहे मात्र काही अधिकारी जयंती साजरी करण्याची केवळ औपचारिकता पार पाडीत असतात तसेच काही कार्यालयात जयंती साजरीच केली जात नाही .याबाबत आम्ही सप्टेंबर २०२४ मध्येच तत्कालीन जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती आता आणखी निवेदन देऊन कारवाईची मागणी करू अन्यथा आंदोलन करणार आहे.