सांगली/तासगाव : डॉ. मनमोहन सिंग यांच्या बौध्दिक विद्वत्तेची तुलना करायची झाल्यास, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोलामोलाचा अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ मनमोहन सिंग यांचा उल्लेख करावा लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर चा ताकदीचा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ हरपला. असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबुराव गुरव यांनी केले. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. तासगाव मधील पक्ष संघटना आणि कार्यकर्ते यांनी काॅग्रेस भवन तासगाव येथे शोक सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
या शोकसभे दरम्यान, काॅग्रेस ओ बी सी सेल चे अध्यक्ष डॉ. विवेक गुरव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या आदर्श राजकीय वाटचालीचा आढावा घेतला. सांगली जिल्हा काँग्रेस चे सेक्रेटरी विशाल चांदुरकर यांनी अमेरिका आणि क्रेमिज विद्यापीठाचे विद्यार्थी ते भारताचे सलग दहा वर्षे पंतप्रधान पद असा जीवन प्रवास उलगडला.
यावेळी प्रा वासुदेव गुरव, अमर खोत, काॅग्रेस, शेकाप, मेंढपाळ आर्मी, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार,आर पी आय ,केसरी प्रतिष्ठान, अंनिस,राष्ट्रसेवा दलांच्या नुतन परिट, नाईक मॅडम ,राजू देवकुळे,भारत थोरात, संभाजी माळी, कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.