सौ नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत चिंदर ग्रामपंचायत मध्ये हळदी-कुंकू समारंभ संपन्न….!

सौ नीलमताई राणे यांच्या उपस्थितीत चिंदर ग्रामपंचायत मध्ये हळदी-कुंकू समारंभ संपन्न….!

नीलम ताईच्या हस्ते चिंदर पंचक्रोशीतील दुर्वा पडवळ, हेमांगी खोत, हिमाली अमरे, मालिनी मयेकर, मेघना रिसबूड, सुचिता परब, नम्रता साळकर यांचा सत्कार

श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालयाला नीलमताई यांच्या हस्ते पुस्तके भेट

सिंधुदुर्ग -विवेक परब
चिंदर ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात असंख्य महिला भगिनींच्या सहभागाने सौ. नीलमताई नारायण राणे यांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सौ. नीलमताई यांच्या हस्ते दिप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. सरपंच सौ. स्वरा पालकर यांच्या हस्ते सौ. नीलमताई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याच प्रमाणे जिल्हा समन्वक दिपलक्ष्मी पडते, भाजप मालवण तालुकाध्यक्ष पुजा करलकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पुजा वेरळकर, कुडाळ तालुकाध्यक्ष सुप्रिया वालावलकर, यांचे स्वागत अनुक्रमे माजी सभापती हिमाली अमरे, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, स्वाती सुर्वे, मयूरी पारकर, दक्षता सुर्वे यांनी केले.
सौ नीलमताई यांच्या हस्ते चिंदर पंचक्रोशीतील समाजात विविध क्षेत्रात नाव कमावणाऱ्या कर्तबगार महिला सौ. दुर्वा पडवळ(ग्रामपंचायत सदस्य आणि बचत गटासाठी योगदान), हेमांगी खोत(शिक्षण क्षेत्र), हिमाली अमरे(सामाजिक क्षेत्र) मालिनी मयेकर(ग्रामीण भागातील कुशल व्यावसायिक) , मेघना रिसबुड(बचत गटासाठी योगदान), सुचिता परब(मूर्तिकार-पेंटर), सौ.नम्रता साळकर(क्रीडा-क्रिकेट पटू) या महिलांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्री देवी सरस्वती वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालयाला ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातून मिळालेली पुस्तके सौ. नीलम ताई यांच्या हस्ते ग्रंथालय कार्यकारिणीला भेट देण्यात आली.
या वेळी बोलताना नीलमताई म्हणाल्या की बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. यातून प्रगती साधण्याचा प्रयत्न करा. आपण सर्वांनी त्याचा फायदा घ्या. मी, केंद्रीय मंत्री राणे साहेब, निलेश राणे साहेब तुमच्या नेहमी पाठीशी आहॊत.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सानिका चिंदरकर, प्रिया पालकर, देविका जाधव, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, शहर सरचिटणीस महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, चित्रपट सेल अध्यक्षा नमिता गावकर, बिळवस सरपंच मानसी पालव तसेच असंख्य महिला भगिनीं, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, चेअरमन देवेंद्र हडकर, शेखर पालकर, संदीप परब, अरविंद घाडी, दिगंबर जाधव, सिद्धेश गोलतकर, रावजी तावडे, संतोष पाताडे, पोलीस पाटील दिनेश पाताडे, रवींद्र घागरे, दिशांत पडवळ, सिद्धेश नाटेकर, विश्राम माळगावकर आदी उपस्थित होते.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× अब ई पेपर यहाँ भी उपलब्ध है
अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks