त्र्यंबकेश्वर मध्ये अन्नदानगजानन महाराज मंदिर संस्थानयेथे घेतला 50 हजारवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ

नाशिक

त्र्यंबकेश्वर ता. 8 फेब.2024.
येथे शेगांव प्रणित गजानन महाराज संस्थान मंदिर व धर्मशाळा प्रसादालय आहे.
श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा पूर्व काळात येथे पन्नास हजारवर भाविकांनी वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. एकादशीला तर उपवास फराळ देण्यात आला. त्र्यंबकेश्वर मध्ये सर्वात मोठ्या अन्नदान गजानन महाराज संस्थान येथे यात्रेत होत असते झाले.
श्री निवृत्तीनाथांचे वारी निमित्य येथे आलेल्या ५३५ वारकरी भजनी दिंड्यांचे श्री संस्थेच्या वतीने हार, उपरणे व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे दशमी, एकादशी व बारस असे तीन दिवस महाप्रसाद सुविधा होती.
महाराष्ट्राचे कान्याकोपऱ्यातून आलेल्या व नियमांची पुर्तता केलेल्या ७८ गांवांना जसे, १० टाळजोळ, १ विणा, १ मृदंग, १ हातोडी असे भजनी साहित्य व श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज गाथा व श्री एकनाथी भागवत या संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले. आजपावेतो श्री संस्थेद्वारा शेगांव, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या तिर्थक्षेत्री महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगाना अशा नऊ राज्यामधील ७६ जिल्ह्यातून आलेल्या १९ हजाराचे वर गावांना भजनी साहित्य व श्री संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे वारी दरम्यान वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे सेवेत श्री गजानन महाराज मठामध्ये धर्मार्थ दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली असून रूग्णांना विनामूल्य औषधोपचार करण्यात आले. वारकऱ्यांच्या उपरोक्त सेवाकार्याकरीता ५०० हून अधिक सेवाधारी कार्यरत होते. अशा रितीने श्री त्र्यंबकराजाचे, श्री निवृत्तीनाथांचे व श्री कृपेने श्री संस्थानकडून वारकऱ्यांची सेवा घडून आली आहे.
प्रसाद मिळाला ,गरजूंना औषधे मिळाली, ग्रंथ भजनी साहित्य मिळाले, आणि गजानन महाराजांचे आशीर्वाद मिळाले
थोडक्यात दवा आणि दुवा दोन्ही मिळाले. अशी गजानन महाराजांची दैवत्वाची ख्याती
आज ही येथे वारकरी भाविकांना आली.
जय गजानन, गण गण गणात बोते .

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks