मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या प्रेरणेतून चिंचणीतील मुलांना पदक बहाल

:अवंतीका पाटील हिला मिळाले गोल्ड मेडल

    सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील हणमंतनगर शाळा महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे, जिथे विद्यार्थ्यांना धनुर्विद्या शिकवली जाते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात शाळेची विशेष ओळख निर्माण होत असतानाच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  तृप्ती धोडमिसे यांनी दि. ११ मार्च रोजी अधिकाऱ्यांनी भेट देऊन या उपक्रमाचे ग्रामीण भागातील शाळांसाठी दिशादर्शक ठरेल असे कौतुक केले आणि दि. १२मार्च २०२५ रोजी डेरवण या ठिकाणी पार पडलेल्या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करुन सांगली जिल्ह्याचे नाव अर्चरी स्पर्धेत जि प शाळेमुळे पुढे येणार आहे.

           जि प शाळेतील खेळाडू अवंतीका पाटील गोल्ड मेडल, ईश्वरी राकेश महाडीक सिल्वर मेडल, वरद महाडीक व शौर्या महाडीक ब्राँझ मेडल असे एकूण चार पदके प्राप्त केली तसेच सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल सर्व खेळाडूंचे तसेच प्रशिक्षक रामलिंग खाडे व मुख्याध्यापक यांचे चिंचणी ग्रामपंचायत व शाळेकडून ,पालकांकडून अभिनंदन तसेच तालुक्यातून कौतुक  केले जात आहे.

फोटो:डेरवण या ठिकाणी पार पडलेल्या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केलेली जिप शाळेचे विद्यार्थी, सरपंच रमेश मदने व पालक आदी

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× अब ई पेपर यहाँ भी उपलब्ध है
अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks