ग्रामीण विकासात युवकांचा सहभाग असावा ” — आमदार डॉ.किरणजी लहामटे

ग्रामीण विकासात युवकांचा सहभाग असावा ” — आमदार डॉ.किरणजी लहामटे*

राजूर:  ” राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामधून श्रम संस्कार होतात तसेच समाजसेवेची गोडी निर्माण होते, तसेच युवकांचा ग्रामीण विकासात सहभाग आवश्यक असावा असे प्रतिपादन अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ किरणजी
लहामटे यांनी केले. ते सा. फु.पुणे विद्यापीठ , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक,व ॲड.एम. एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजुर आयोजित जहागीरदारवाडी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागीरदार वाडी चे तरूण सरपंच श्री. पंढरीनाथ खाडे उपस्थित होते. आपल्या पुढील भाषणात आमदार डॉ. किरणजी लहामटे म्हणाले की ,”आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून आजच्या तरुणांनी  जनजागृती साठी पुढे आले पाहिजे. व गावाच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे “कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी करून शिबिर आयोजना मागील भूमिका विशद केली. या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मा. विनयजी सावंत, सत्यनिकेतन संस्थेचे सचिव मा.श्री.टी.एन. कानवडे, सत्यनिकेतन संस्थेचे संचालक मा. एस .टी येलमामे सर, श्रीरामशेठ पन्हाळे, श्री काठे, तसेच ग्रामसेवक माधव धोंगडे, कळसुबाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र जाधव, पोलीस पाटील नामदेवजी खाडे, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई  घाने, उपसरपंच रुक्मिणी करटुले इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार याप्रसंगी करण्यात आला. या विशेष हिवाळी शिबिरात २०० विद्यार्थी सहभागी झालेले असून दिनांक १९ ते २५ जानेवारी २०२४ या शिबिर कालावधीत वृक्ष संवर्धन व पर्यावरण जागृती, रस्ते दुरुस्ती, श्रमसाक्षरता, जलसंवर्धन व वनराई बंधारे निर्मिती, बालविवाह बंदी, लोकसंख्या नियंत्रण, ग्राम सर्वेक्षण, आरोग्य जनजागृती, सर्वरोग निदान शिबिर, प्रबोधन पर पथनाट्य या यासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. एल. बी. काकडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.थोरात बी.के यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.तेलोरे बी.एच यांनी केले.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.सौ.डी बी तांबे,प्रा अस्वले एस.आर.,डॉ नितीन देशमुख, निकम मामा, विलास लांघी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks