बेमुदत उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनामुळे तात्पुरते स्थगित

अपंग जनता दल महाराष्ट्र राज्याचे उप-प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेब लांडे हे अपंगांच्या विविध मागण्या घेऊन कोपरगाव तहसील कार्यालयावरील उपोषणाला यश
अपंग जनता दल चे उप-प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब लांडे यांच्या मागण्यांना शासनाने प्रतिसाद द्यावा. व उपोषण करते बाळासाहेब लांडे यांचे मनोबल वाढावे. यासाठी महाराष्ट्रातील तमाम सामाजिक संघटना, व महाराष्ट्रातील अपंग बंधू भगिनी यांनी पाठिंबा दिला. व त्यांच्या उपोषणात सहभागी झाले. अपंगांवर होणारे अन्याय कधी थांबणार, आज या महाराष्ट्रामध्ये लाखो अपंग असे आहे की, त्यांचं दैनंदिन जीवन अतिशय अवघड असून, हे सरकार त्यांना अतिशय कमी मानधन देऊन जणूकाही अपंगांवर उपकारच करत आहे. या झोपलेल्या शासनाला जाग करण्याची वेळ आली असून, अपंगांना मिळणाऱ्या या मानधनामध्ये (5000) पाच हजार रुपयांपर्यंत वाढ व्हावी. यासाठी अपंग जनता दलचे महाराष्ट्र राज्याचे उप-प्रदेशाध्यक्ष कोपरगाव तहसील कार्यालयावर उपोषणासाठी बसले होते,
उपोषणामधील खालील मागण्या पाठपुराव्यासाठी प्रशासनाकडे दाखल केल्या
1). संजय गांधी व श्रावणबाळ पेन्शन योजनेत वाढ करून ती कमीत कमी पाच हजार रुपये करण्यात यावी.
2). अपंगांना स्वमालकीची जागा उपलब्ध नसल्यामुळे शासकीय घरकुलाचा लाभ दिला जात नाही तरी स्वमालकीची हक्काची जागा खरेदी करण्यासाठी तीन लाख रुपये अनुदान देण्यात यावे.
3). संजय गांधी पेन्शन योजनेचे पैसे दरमहा एक तारखेस अपंगांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात यावे.
4). अपंगांची दिवाळी दरवर्षी गोड व्हावी याकरता अपंगांना संजय गांधी पेन्शन योजनेप्रमाणे (10,000) दहा हजार रुपये बोनस भत्ता देण्यात यावा.
5). स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये नाम निर्देशन पत्र दाखल न करता त्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावे. तशा प्रकारचे प्रकारचा कायदा संसदेत आणावा.
या महाराष्ट्रामधील प्रशासन अपंग बंधू भगिनी कडे अजिबातच लक्ष देताना दिसत नाही. फक्त इलेक्शन आलं की त्यांच्या मतासाठी फक्त आश्वासन देतात, आणि त्यांचं काम झालं की सगळे विसरून जातात. आज अपंग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी सुद्धा 200 स्क्वेअर फुट जागा शासन देतं परंतु हे महाराष्ट्र सरकार अपंगांच्या विषयी अजिबातच संवेदनशील दिसत नाही. आजच्या या महागाईच्या काळामध्ये अपंगांना त्यांचं कुटुंब चालवणं देखील खूप जिकरीचं होत आहे. हाता पायाने अपंग असल्यावर कष्टही करू शकत नाही. अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये अनेक अपंग बांधवांची असून हे सरकार अपंगांची खरंच हेळसांड करतय ही हेंळसाड कुठेतरी थांबावी, यासाठी अपंग जनता दल महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. बाळासाहेब लांडे हे येत्या दि. 02/11/2023 दोन नोव्हेंबर पासून ते मुदत आमरण उपोषणासाठी कोपरगाव येथे तहसील कार्यालयासमोर बसले होते तरीही या उपोषणामध्ये जास्तीत जास्त सामाजिक संघटनांनी व अपंग बंधू-भगिनींनी सहभाग घेतला. व बाळासाहेब लांडे यांची ताकद वाढविली आपला अपंगांचा हक्क घेतल्याशिवाय राहायचं नाही. आपल्या प्रत्येक मताची किंमत ह्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना दाखवून देऊ. यासाठी सर्वजण एकत्र आले म्हणूनच आपल्या बाळासाहेब लांडे यांना सर्वांनी पाठिंबा देऊन त्यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणावर यश देखील मिळले.
दिं. 2 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या न्याय हक्काचे संजय गांधी पेन्शन योजना 5000 रुपये करण्यात यावेत. तसेच ते अनुदान दर महिन्याला 1 ते 5 तारखेच्या आत सर्व अपंग बंधू भगिनीं च्या बॅक खात्यावर जमा करण्यात यावेत. यासारख्या ईतर मागण्या मान्य करून, घेण्यासाठी कोपरगाव तहसीलदार कार्यालय समोर अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे यांचे बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते. त्या अनुषंगाने मा तहसीलदार, तसेच मा जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांनी श्री बाळासाहेब लांडे यांना लेखी पत्र देऊन त्यांचं प्रमाणे महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव मा. अभय महाजन यांचेशी भ्रंमन द्वारे सविस्तर चर्चा करून येत्या 7-डिसेंबर प्रयत्न अंतिम निर्णय घेऊन आपणास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असे आश्वासन दिल्याने बाळासाहेब लांडे यांनी दिनांक 03/11/2023 रोजी दुपारी 12 वाजता बेमुदत आमरण उपोषण तात्पुरते स्वरुपात स्थगित करतांना, त्यांना सांगितले की आपण मला दिं 7 डिसेंबर 2023 प्रयत्न आपण वेळ मागत आहात, त्या अनुषंगाने मी आपणास 15 डिसेंबर प्रयत्न वेळ देत आहेत परंतु तो प्रयत्न मला न्याय मिळाला नाहीतर, मात्र मी दिं 20 डिसेंबर 2023 पासून मुबंई येथील मंत्रालय समोर येऊन बेमुदत अन्नपाणी त्याग आंदोलनास बसणार आहेत. याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील.