हेलिकॉप्टर मध्ये बसणाऱ्यांना जनतेच्या हिताचे स्वैर सुतक नाही : संग्रामसिंह देशमुख ; रामापुर, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव, मोहित्यांचे वडगांव प्रचार दौरा
सांगली/कडेगाव न्युज :
हेलिकॉप्टरमध्ये बसणाऱ्यांना जनतेच्या हिताचे स्वैर सुतक नाही, अशी टीका पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी प्रचार दौऱ्या दरम्यान केली.
रामापुर, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव, मोहित्यांचे वडगाव प्रचार दौरा आज झाला. गावोगावी संग्रामसिंह देशमुख यांचे प्रचंड उत्साहात नागरिक स्वागत करत होते. महिला औक्षण करत होत्या. या दौऱ्यात कृष्णा कारखान्याचे संचालक बी. के. शिंदे यांच्यासह रामापूर येथे अंकुश यादव, निवृत्ती माळी, पोपट शिंदे, सुखदेव शिंदे, दिपक पाटील, अरविंद गायकवाड, अर्जून शिंदे, राजेंद्र यादव, शिरगाव येथे संतोष बर्गे, संतोष माने, प्रदीप शेवाळे, सर्जेराव लोंढे, सुभाष माने, कैलास पेटकर, गोपाळराव देशमुख, दुर्योधन माने, कृष्णा कारखान्याचे संचालक बी. के. शिंदे, उत्तम देशमुख, सुनिल निकम, देवराष्ट्रे येथे बाळासाहेब पवार, नंदुकुमार महाजन, माणिक मोरे, संजय महिंद, बाबासो शिंदे, संदीप महिंद, सचिन महिंद, दिपक भोंगाळे, आशुतोष मोरे, दिपक साळुंखे, सुशांत मोरे, अजित मोरे, कुंभारगाव येथे दिलीप जमदाडे, शहाजी साळुंखे, पांडुरंग जमदाडे, धोंडीराम जमदाडे, राजेंद्र जाधव, कुंभारगाव सोसायटी चेअरमन नेताजी साळुंखे, बाजीराव साळुंखे, जय नालगे, मोहित्यांचे वडगाव येथे सौ. सत्यभामा सुरेश मोहिते, पल्लवी सुधीर मोहिते, सुरेश मोहिते, सौ. नंदिनी मोहिते, पपिताताई सुतार, पांडुरंग मोहिते, कृष्णदेव मोहिते, पटेराव मोहिते, माणिक मोहिते सहभागी झाले होते.
संग्रामसिंह देशमुख म्हणाले, या मतदारसंघातील काही मंडळी आपल्या स्वतःचा विकास करण्यामध्ये रमली आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर मोबाईल चालत नाही आणि मोबाईल बंद झाल्यानंतर जनतेची सुखदुःखे समजत नाहीत. आणि त्यांना ती जाणूनही घ्यायची नाहीत. का मी सांगायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना ती किंमत देत नाहीत. चांगल्या कामाच्या आडवे येणे हे त्यांचे काम आहे. एका माणसाला नको देऊ एका घरातले पाच माणसे त्यांनी वापरली आहेत. आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पलूस कडेगाव मतदार संघाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास आम्ही केला आहे. एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून संधी द्या मी या भागाचा विकास करून दाखवेन.