अवकाळी व गारपीटग्रस्त शेती पिकाचे तात्काळ पंचनामे करा : प्रभाकर पाटील

सांगली/तासगाव : तासगाव तालुक्यात बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासन स्तरावर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी तासगाव विधानसभा क्षेत्र भाजपचे अध्यक्ष प्रभाकरबाबा पाटील यांनी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गुरुवारी रात्री उशिरा प्रभाकर पाटील यांनी पडत्या पावसात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. मणेराजुरी व सावर्डे परिसरात झालेल्या गारपीट व अति पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. याची प्रभाकर पाटील यांनी रात्री उशिरापर्यंत या परिसरातील द्राक्ष बागांची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देत रात्री तहसीलदार व संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच जिल्हाधिकारी दयानिधी यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले की, तासगांव तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे तासगांव तालुक्यातील द्राक्षबागा व सर्वच पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाणेची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय स्तरावरुन सदर झालेल्या शेती पीकांच्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ होवून त्याचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच सदर झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवून त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदत होणेही गरजेचे आहे. तासगांव तालुक्यात द्राक्ष बागेसह हंगामी पीके घेतली जातात. शेतकरी या शेतीपीकांवर अवलंबून असून झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटेमुळे तो हवालदील झालेला आहे.
शेतीपीकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळून मदत व्हावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× कुछ समझ न आये में हूँ न ...
अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks