सामाजिक बांधिलकी जपणारी तासगाव अर्बन बँक : खा. अजित गोपछडे

सांगली/ तासगाव : तासगाव अर्बन बँक ही बैंकिंग क्षेत्रासोबतच सामाजीक बांधीलकी जपत कन्यादान ठेव योजना, गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, तलावातील गाळ काढणेसाठी आर्थिक मदत तसेच सभासद कल्याण निधी मधून गरजू सभासदांना आर्थिक मदत करीत आहे. असे प्रतिपादन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले. तासगाव अर्बन को-ऑपरेटिव बँक, शाखा तासगाव येथे सदिच्छा भेटी दरम्यान ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी बँकेच्या कामकाजाबाबत गौरवोद्गार काढून बँकेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
लिंगायत समाज सन्मान यात्रेवेळी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी तासगांव अर्बन बँकेस सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बँकेचे संचालक विनय शेटे यांनी सुत्रसंचालक व प्रास्ताविक केले. बँकेचे चेअरमन महेश्वर हिंगमिरे व व्हा. चेअरमन कुमार शेटे यांच्या हस्ते खा. गोपछडे यांचे स्वागत व सत्कार करणेत आला. बँकेचे चेअरमन श्री. हिंगमिरे यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या आजपर्यंतच्या प्रगतीची तसेच बँकेच्या आर्थिक स्थितीबाबतची माहिती दिली.
यावेळी डॉ. रविंद्र अरळी (सदस्य, सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया), लिंगायत समाज सन्मान यात्रेचे संयोजक नितीन शेटे, बँकेचे संचालक सदाशिव शेटे, अरुण पाटील, अनिल कुत्ते, उदय वाटकर, धोंडीराम सावंत, रामशेठ शेटे, राजेंद्र माळी, सौरभ हिंगमिरे, उदय डफळापूरकर (सीए), अॅड. आशिष अडगळे, श्रीमती सविता पैलवान, सौ. उमा हिंगमिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, असि.जन. मॅनेजर नारायण सगरे, विनायक मेंडगुले तसेच कुंभार समाज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ कुंभार, तासगांव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks