आचरा केंद्र शाळेत केंद्र प्रमुख सुगंधा केदार गुरव यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा संपन्न…..!

आचरा केंद्र शाळेत केंद्र प्रमुख सुगंधा केदार गुरव यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा संपन्न…..!

सिंधुदुर्ग-

सुगंधा केदार गुरव या दिनांक 31 मार्च रोजी नियत वयोमानानुसार केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्ताने केंद्रशाळा आचरे नंबर एक येथे दिनांक 31 मार्च रोजी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्गाने त्यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर यांच्या हस्ते सुगंधा गुरव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शुभेच्छा देऊन करण्यात आली. तसेच शिक्षक वर्गाने सुगंधा केदार गुरव यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय शिक्षक समिती आचरे प्रभाग, आचरे उर्दू शाळा, कपिल गुरव यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या तर विशेष म्हणजे या सोहळ्यानिमित्ताने आचरे केंद्रातील प्रत्येक शाळेच्या शिक्षकांनी आपापल्या भावना व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
गुरव मॅडम यांचे चिरंजीव हरीश याने मॅडमचे लाडके दैवत श्रीकृष्ण मूर्ती भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संघटना प्रतिनिधी नवनाथ भोळे, मंगेश कांबळी आदी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन मॅडम विषयीचा आदर व्यक्त केला. या सर्वांच्या प्रेमळ शुभेच्छांना उत्तर देताना श्रीमती सुगंधा गुरव म्हणाल्या की, विद्यार्थी दशे पासून शिक्षणाविषयी आणि शिक्षकी पेशाबद्दल आदर असल्याने मी या शिक्षकी पेशाकडे वळले. बालवाडी पासून सर्व शिक्षण या आचरे नंबर 1 या शाळेत झाले आणि आता शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त ही या शाळेतूनच होत आहे, याचे मला समाधान वाटते. मला माझ्या जीवनात असंख्य गुरुजन लाभले त्यांनी माझ्यावर संस्कार केले ते सर्व गुरुजन वंदनीय आहेत. मला माझे विद्यार्थी, शिक्षक आणि सहकाऱ्यानी तसेच अधिकारी वर्गाने खूप सहकार्य केले. विशेष म्हणजे सुरेश ठाकूर गुरुजी, फर्नांडिस गुरुजी, सौदागर बाई, पावसकर बाई, टिळक बाई, फणसेकर बाई, पाडावे गुरुजी हे माझे प्राथमिक शिक्षक. त्यांनी मला घडवलं. सर्व प्रकारचे ज्ञान दिले, उत्तम संस्कार रुजवले आणि माझे आई-वडिलांनी तसेच नातेवाईकांनी चांगले तेवढे घ्यावे आणि प्रामाणिकपणे वागावे, कोणाचा अपमान करू नये’ अशी शिकवण दिली. श्री रामेश्वराच्या कृपेने गेली 36 वर्षे 3 महिने 11 दिवस इतकी प्रदीर्घ सेवा उत्तम प्रकारे केल्याचे फळ आहे आणि अखंडपणे कोणत्याही प्रकारचा डाग न लागता स्वच्छ सेवा केल्याचा आपणास निश्चित अभिमान आहे, असेही यावेळी त्या म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मंगेश मेस्त्री, माता पालक संघ उपाध्यक्ष शमा शेख, माजी उपाध्यक्षा सुरेखा सामंत, मुख्याध्यापक चंद्रकांत माने, पांडुरंग कोचरेकर, आबा भाटकर, हरीश गुरव, नारायण मेस्त्री व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अरुण आडे, श्रीमती अमृता मांजरेकर यांनी तर आभार प्रदर्शन संतोष आचरेकर, रामकृष्ण रेवडेकर यांनी केले.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× अब ई पेपर यहाँ भी उपलब्ध है
अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks