अँड्. देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा

प्रतिनिधी -:
अँड् . एम.एन.देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी मा. एस.बी.नवले दिवाणी न्यायधिस ‘क’ स्तर राजूर व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. एल.बी.काकडे यांनी विद्यार्थ्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची माहिती दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुरदर्शी धोरणामुळेच आज आपण संपूर्ण भारत एकसंघ पहात आहोत. त्यांनी भारतातील संस्थानांचे विलीनीकरण करून भारताला एकसंघ बनविण्याचे महत्त्वाचे कार्य केले असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. यावेळी ‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजने चे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.थोरात लेफ्टनंट आर.सी.मुठे,डॉ. व्ही.एन.गिते, डॉ बी.टी.शेणकर,प्रा.कुसमुडे ,प्रा.बी.एच.तेलोरे प्रा.कासार सर प्रा.यादव सर हे उपस्थित होते.