भारतीय मीडिया फाउंडेशन व न्याईक मानव अधिकार यांचे संयुक्त माने आरोग्य शिबीर

अहमदनगर अकोले तालुक्यातील राजुर येथे भारतीय मीडिया फाउंडेशन व न्याईक मानव अधिकार यांचे संयुक्त माने आरोग्य शिबीर

अकोले
रोजी राजुर येथे दत्त मंदिरात भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित करून, भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र. व न्यायिक मानवाधिकार परिषद महाराष्ट्र. तसेच राजूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दीड लाख रुपये पर्यंत मोफत वैद्यकीय सेवा आपल्या गावामध्ये मोफत आरोग्य निदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये मोफत तपासणी आणि निदान केले आणि शिबिराच्या लाभ घेऊन अनेक कुटुंबांच्या सदस्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी सोनांबेकर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल संगमनेर येथून डॉक्टर एखंडे, जनसंपर्क अधिकारी संदीप शिंदे साहेब, मॅनेजर कैलास आरगडे, मेडिकल स्टाफ साई किरण गडगे, दीपक घुगे, व नर्सिंग स्टाफ मच्छिंद्र निकम, ही सर्व टीम घेऊन सोनांबेकर मल्टी हॉस्पिटल यांच्या सहयोगाने राजुर येथील दत्त मंदिरामध्ये भव्य मोफत आरोग्य निदान शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये 150 ते १६० पेशंटची तपासणी करून, या सर्व पेशंटला मोफत औषध उपचार देण्यात आले. या योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस, कॅन्सरवरील केमोथेरपी, हृदयाची अँजिओप्लास्टी, पोटाचे विकार, अस्थी विकार, मेंदू व मज्जा संस्था विकार, मूत्रपिंड, मूत्र मार्ग विकार, तपासणी व उपचार या योजनेअंतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी असतील. अशा कुटुंबांना या योजनेमध्ये सामाविष्ट करून सर्व प्रामुख्याने प्राप्त कंपन्यांची कॅशलेस मेडिकल मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या शिबिरात भारतीय मीडिया फाउंडेशनचे राष्ट्रीय कृषी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र वाघ साहेब, राजुर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. पुष्पा ताई निगळे, किसान मजदूर पोरांचे चेअरमन जयरामजी धादवड, युथचे प्रदेशाध्यक्ष सचिन मुतडक, अकोले तालुका संघटक विजय हेकरे, शरद यलमामे, रोहिदास लहामगे, न्यायिक मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ता प्राध्यापक योगेश बाराथे, सचिव श्याम पवार, आरोग्य मित्र वसंत आरोटे साहेब, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ कानकाटे,अतुल पवार, प्रमोद देशमुख, बाळासाहेब देशमुख, एडवोकेट दत्ता निगळे, शेखर वालझाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला आलेल्या सर्व सोनांबेकर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या टीमचे स्वागत करण्यात आले. सकाळी दहा नंतर पेशंट तपासणी सुरू झाली एक ते दीड वाजेपर्यंत सर्व पेशंट तपासणी करण्यात आली. त्यानंतर राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक श्री गणेश जी इंगळे साहेब, यांनी देखील या शिबिराला भेट देऊन त्यांच्या सहकार्यासह या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबिरा चे आयोजन न्याय मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ता प्राध्यापक योगेश बाराथे सर, व भारतीय मीडिया फाउंडेशन युथ कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सचिन मुतडक, यांनी केले होते.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks