मानवी शरीरावर मोठ मोठ्या शस्त्रक्रिया करण्यांसाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी देणार मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन. – मा. राजेंद्र वाघ
भारतीय मीडिया फाऊंडेशन देशातील गोरगरीब जनतेसाठी मा. मोदी यांना घालणार साकडे

महाराष्ट्र मुंबई :- ( दि. 23/11/2022 ) आपल्या भारत देशात 80 टक्के जनता ही मध्यमवर्गीय असून हातावर काम धंदा करून आपले जीवन जगतात अशा परिस्थितीत आपल्या घराचा घर खर्च चालून मुला बाळांना देण्यासाठी शिक्षणाचा खर्च ही त्यांच्याकडे खर्चिक नसते अशा हालाखीच्या जीवनाशी झुंज देताना जर घरातील एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला मोठा आजार जडला तर त्याला उपचारासाठी नेण्याची ही परिस्थिती काही कुटुंबांची नसते त्यात जर एखादी मोठी शस्त्रक्रिया करायची म्हणाल तर लाखोच्या घरात दवाखान्यात खर्च करावयाची परिस्थिती नसल्यामुळे अनेक नागरिकांना शस्त्रक्रिया न झाल्यामुळे आपले जीवन अर्ध्यातच सोडून तसेच आपल्या लेकरा बाळांना वाऱ्यावर सोडून मरण पत्करावे लागते अशा मोठमोठ्या शस्त्रक्रियांसाठी आजच्या जीवनात खूप मोठी रक्कम मोजावी लागते त्यात हृदय शस्त्रक्रिया. बायपास सारखी सर्जरी. मेंदूवरील आजारांची सर्जरी. कॅन्सर सारख्या आजारांवर शस्त्रक्रिया. व अशा अनेक शस्त्रक्रिया करण्यासाठी दवाखान्यात लाखोच्या घरात आवाजावी बिले आकारण्यात येतात समाजात एखाद्यावर जर शस्त्रक्रिया झाली त्याचा खर्च ऐकल्यावर अनेक गोरगरीब कुटुंब धास्तावतात आणि एकीकडे जर बघितले तर शासकीय आरोग्य विभागाची यंत्रणा अशा मोठमोठ्या शस्त्रक्रियांसाठी आपल्या शासकीय रुग्णालयातून शस्त्रक्रिया होत नसल्याचा दावा करतात आणि त्या कुटुंबाला कुटुंबातील व्यक्तीला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेण्यास मजबूर करतात आणि आजच्या युगात प्रायव्हेट हॉस्पिटल वर कोणाचाच ताबा नसल्यामुळे शासकीय वचक नसल्यामुळे शस्त्रक्रियावर आवाजावी खर्च आकारला जातो हा सर्व आराखडा पाहून एका गरीब कुटुंबातील रुग्णाला आपली शस्त्रक्रिया न करता आपले जीवन अर्ध्यात सोडून जावे लागते सन्माननीय पंतप्रधान साहेब जर आपण आपल्या देशवासीयांसाठी काही करायची इच्छा ठेवत असाल तर या गोरगरीब कुटुंबांना ज्या शस्त्रक्रियांवर आवाजावी खर्च येतो तो खर्च शस्त्रक्रियांमुळे होतो त्यामुळे मी आपणांस या निवेदनाद्वारे कळवू इच्छितो की आज अख्खा भारत देश आपल्याकडे मोठे आशेने बघतोय जर आपण या मोठमोठ्या शस्त्रक्रियांवर लागणारा खर्च या शस्त्रक्रियांची बिल आकारणी तसेच तपासणी चार्जेस संपूर्ण भारत देशात खाजगी हॉस्पिटल सह इतर सेवाभावी हॉस्पिटलची एकसमान रक्कम आकारण्याचा व देशातील सर्वसामान्य जनतेला मोजक्या दरात परवडेल असा चार्ज आकारण्याची तरतूद कराल व एक छोटी रक्कम आकारून त्या G R ची प्रत प्रत्येक दवाखान्याच्या समोरील भिंतीवर लावण्याचा आदेश कराल तर कुठेतरी गोरगरीब जनता आपलं आयुष्य जीवन संपूर्ण जगू असा विश्वास त्यांना येऊ शकतो आणि ते निर्भयतेने जगात वावरू शकतात हा सर्व विचार आपण सहानुभूतीपूर्वक करून लवकरच निर्णय घ्याल अशी अपेक्षा बाळगतो.
अन्यथा भविष्यात भारतीय मीडिया फाउंडेशन या गोरगरीब जनतेसाठी या आरोग्य न्यायव्यवस्थेच्या विरोधात एक मोठे जन आंदोलन उभारेल असा इशारा मी आपणास देतो तसेच आपल्या भारत देशातील आरोग्य विभाग व्यवस्थेलाही देतो.