
तुर्भे येथील बी. ए. आर. सी कंपनीच्या बाजूला असलेल्या ट्रक ट्रमिनलला (अगोदर बस डेपो) भीषण आग लागली आहे.
सावध रहा. इतकी स्फोटक पदार्थ आली कुठून.
नवी मुंबई महानगरपालिका तुर्भे विभागातील अतिक्रमण अधिकारी व ए.पी.एम.सी पोलिस अधिकारी यांना यांची कल्पना नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अश्या अधिकार्यांचे निलंबन होणे आवश्यक व जनतेच्या हिताचे आहे.
नवी मुंबई हद्दीत अश्या घटना वाढत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त व नवी मुंबई पोलीस आयुक्त यावर कोणती कारवाई करणार या गोष्टी वर नवी मुंबईतील जनतेचे लक्ष असणार आहे.