जाहीर निषेध. जाहीर निषेध.
शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांचा जाहिर निषेध.

येणाऱ्या २० फेब्रुवारी २०२५ रोजी शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांचा जाहिर निषेध करत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तालय समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. गरीब मुलीला व तिच्या पालकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या शाळेची बाजु शिक्षण अधिकारी घेतील तर गरिबांचा न्याय करणार कोण. त्यामुळे भारतीय मिडिया फाऊंडेशनचे डिप्टि चेअरमन श्री किशोर लोंढे यांनी शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वचक बसेल व गरिबांना न्याय मिळेल.
तसेच वकील अनिल बंडगर यांनी सांगितले की या परिवाराला योग्य व संपुर्ण मदत शेवट पर्यंत करणार.
सोबत.
सुनील बोर्डे, धर्मेंद्र ठाकुर, विजय साळवे, दिपक निगडे, दत्तात्रेय दिवाणे, किशोर राठोड, आकाश इटकर यांनी देखील शेवट पर्यंत साथ देणार असे आश्वासन दिले. तसेच सर्वांना उपोषणात सहभागी व्हावे.
ठिकाण:- नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तालय समोर.
वेळ:- सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.