नवी मुंबई वाशी येथे भारतीय मीडिया फाऊंडेशन ची महाराष्ट्र राज्याची 2023 मिटींग संपन्न

नवी मुंबई वाशी येथे भारतीय मीडिया फाऊंडेशन ची महाराष्ट्र राज्याची 2023 मिटींग संपन्न

महाराष्ट्र राज्याच्या सर्व कमेटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, प्रदेश अध्यक्ष यांच्या नावांची महाराष्ट्र राज्याचे मॅनेजिंग प्रभारी मा. राजेंद्र वाघ यांनी घोषणा

नवी मुबंई – रोजी नवी मुंबई वाशी येथे भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीने मीटिंगचे आयोजन केले होते. या मीटिंगसाठी भारतीय मीडिया फाउंडेशनची प्रभारी व मॅनेजिंग डायरेक्टर प्रभारी मा. राजेंद्र वाघ साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे चेअरमन मा. हिरालालजी लोथे साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे युथ चे प्रदेशाध्यक्ष मा. सचिन मुतडक, व भाऊसाहेब गिते साहेब, सर्वजण मुंबई येथे या मीटिंगसाठी उपस्थित होते. या मिटींगचे आयोजन महाराष्ट्र राज्य परिवाहन फोरम कमिटीचे चेअरमन सुनील बोर्डे साहेबांनी नवी मुंबई वाशी येथे केले. ह्या मीटिंग चे अध्यक्ष स्थान माननीय राजेंद्र वाघ साहेब यांनी स्वीकारले. व मीटिंगची सुरुवात केली सुरुवातीला फोरम कमिटीचे चेअरमन संजय बोर्डे साहेब यांचा सत्कार मा. वाघ साहेबांनी केला. तसेच नवीनच सैनिक फोरम कमिटीचे नवनिर्वाचित नियुक्त झालेले राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील, यांचाही सत्कार मा. राजेंद्र वाघ साहेबांनी केला. व सुनील बोर्डे साहेब व बाळासाहेब पाटील यांनी मा. राजेंद्र वाघ साहेब यांचा सत्कार केला. तसेच महाराष्ट्राचे चेअरमन लोथे साहेब व प्रदेशाध्यक्ष सचिन मुतडक यांचा ही सत्कार या समारंभामध्ये करण्यात आला. सुरुवातीला भारतीय मीडिया फाउंडेशन म्हणजे नेमकं काय व ह्या मीडियाचे उद्दिष्ट काय या संदर्भात युथ चे प्रदेशाध्यक्ष सचिन मुतडक यांनी या मीटिंगमध्ये मार्गदर्शन केले. व त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे चेअरमन लोथे साहेब यांनी देखील भारतीय मीडिया फाउंडेशन हे सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व गोरगरिबांना मदत करण्यासाठी या महाराष्ट्र राज्यात सदैव तत्पर आहे. यावर खूप छान मार्गदर्शन केले. मीटिंग साठी आलेल्या पदाधिकाऱ्यांनी अनेक समस्या मांडल्या, व सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या महाराष्ट्र राज्यामध्ये रिक्षावाला म्हणजे हा सर्वसाधारण माणूस समजला जातो. परंतु हा रिक्षावाला सर्वांना जोडणारा धागा कसा आहे. व रिक्षावाल्यांच्या अनेक समस्या समजावून घेऊन मुळातच या रिक्षावर असलेलं परमिट सुद्धा बंद झालं पाहिजे, या संदर्भात देखील चर्चा झाली. तसेच सैनिक फोरम कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी देखील मार्गदर्शन केलं. व परिवहन फोरम कमिटीचे नवीनच नियुक्त चेअरमन माननीय सुनील बोर्डे साहेब यांनी देखील मार्गदर्शन करून, खरोखर या रिक्षावाल्यांवर होणारा अन्याय देखील थांबला पाहिजे. व या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे, या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच भाऊसाहेब गीते हे माजी सैनिक यांचे मनोगत व्यक्त करताना, यांनी अतिशय छान असा प्रश्न मांडला की या भारतामध्ये प्रत्येकाला कुठे ना कुठे स्थान आहे. पण माझा जो हा सैनिक आहे या सैनिकाला रिटायरमेंट नंतर कुठेही स्थान नाही. ज्याप्रमाणे विद्यार्थी मतदार संघ आहे. त्याचप्रमाणे या सैनिकांचा देखील एक मतदार संघ स्थापन करून यांचे सेपरेट डिपार्टमेंट स्थापन करावे व या डिपार्टमेंटचे आमदार हे सैनिकांविषयी चांगल्या प्रकारे काम करू शकतील. अतिशय सुंदर अशी प्रस्तावना मान्य गीते साहेबांनी मांडली. यानंतर सन्माननीय राजेंद्र वाघ साहेब यांनी सर्वांना अतिशय समर्पक शब्दात भारतीय मीडिया फाउंडेशन हे न्याय देण्याचं काम करत असताना न्याय देताना आलेल्या अडचणींवर कशा
मात करावी, व सगळे प्रश्न सोडवताना कुठलीही अडचण आली, तर ते स्वतः कशा पद्धतीने लक्ष घालतात या विषयी सविस्तर माहिती वाघ साहेबांनी या मीटिंगमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितली. व सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वाशी येथील मीटिंग संपन्न झाली. व अनेक पदाधिकाऱ्यांच्या ओळख ओळखी होऊन सर्वसामान्यांसाठी आपल्याला काय काय करता येईल या संदर्भात सर्व कमिटीने विचार विनिमय केला. या मीटिंगसाठी मुंबई मधून सुनील बोर्डे साहेब, बाळासाहेब पाटील साहेब, नंदू पटेल साहेब, विजय साळवे साहेब, धर्मदेव ठाकूर साहेब, बबन घुले साहेब, पुंडलिक लोखंडे साहेब, अल्ताफ शेख साहेब, शंकर पिल्ले साहेब, सुधीर ठाकूर साहेब, वैशाली सातपुते, मीनाक्षी कोंडार, कविता वाकचौरे, यशोदास जयस्वाल, सुनील घोरपडे, धीरज गुप्ता, शिवाजी इंगळे, मोहन घटने, मधुकर रिप्ले, सायली चंदनशिवे, मार्को यल्लमचिल्ली, संजय यादव, अनेकांनी उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा तसेच नवी मुंबई वाशी येथिल सर्व रिक्षा युनियन चे चालक मालक पण उपस्थित होते. सदर कार्यक्रम दोन तीन तासाची मीटिंग झाल्यानंतर समाप्ती मा. सुनिल बोर्ड साहेब यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानुन केली . त्यानंतर सर्वांनी जेवण करून या कार्यक्रमाची सांगता झाली.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks