“महाराजस्व अभियान” अंतर्गत मांजर्डे येथे शिबिर

सांगली /तासगाव : तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे शुक्रवार दि. १३/०६/२०२५ रोजी ग्रामपंचायत मांजर्डे हददीतील विठठल मंदिर या ठिकाणी सकाळी ९.०० वाजता शिबिरास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या “महाराजस्व अभियान” शिबिर अभियान अंतर्गत ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विदयार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशनकार्ड वाटप, सामाजिक लाभाच्या योजना जसे संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांचा लाभ तसेच प्रमाणपत्रांचे वाटप, प्रमाणपत्रावावत जनतेच्या तक्रारी तातडीने निकाली काढणे जाणार असल्याची माहिती तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली.
यावेळी विविध दाखले वितरण, नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे तसेच महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये पुरवठा विभाग तहसिल कार्यालय तासगांव, सेतू विभाग, ७/१२ मधील चुकांची किंवा त्रुटीची दुरुस्ती करणे, Agristack योजनेमध्ये नोंदणी, रेशन कार्डांमध्ये इ -के वाय सी करणे, नैसर्गिक आपत्ती अनुदानाची इ -के वाय सी, पी एम किसान याबाबतचे प्रलंबित कामकाज निकाली काढण्यावरोबर तक्रारीचे समाधान करण्यात येणार आहे. मांजर्डे मंडळातील गावांमधील नागरिकांनी या शिबिरामध्ये उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महसूल विभाग तासगांव मार्फत करण्यात येत आहे.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks