छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रोत्साहन पर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

सांगली/तासगाव : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त श्री दुर्गामाता बाल संस्कार वर्ग मार्फत बुधवार दि.१९-०२-२०२५ रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बालवयातच मुलांना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरित्राची माहिती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दोन गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे. पालकांनी आपल्या पाल्याची तयारी करून घ्यावी आणि स्पर्धेमध्ये मुलांना सहभागी करावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी लहान गट- इयत्ता १ ली ते ४ थी करीता विषय छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावरील गीत गायन किंवा पोवाडा गायन तर मोठा गट इयत्ता ५ वी ते ८ वी साठी विषय - छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरित्रावरील एक प्रेरणादायी कथा. दोन्ही गटातील स्पर्धकांसाठी वेळेची मर्यादा तीन मिनिटाची राहील. परीक्षकांच्या निर्णयानुसार विजेत्या स्पर्धकांना कौतुकास्पद पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. स्पर्धेचे ठिकाण श्री दुर्गा माता मंदिर, ढवळवेस, तासगाव येथे तर स्पर्धेची वेळ संध्याकाळी 4 ते 6 अशी राहील. अधिक माहिती साठी अभिजित घोलप, स्वप्नील खबाले, जयंत जोगळेकर, भानुदास कुलकर्णी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.