
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत : रुग्णालयाकडून अपेक्षा
सांगली/ तासगाव : येथील लाइफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्यदायी योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये पोलीस कुटुंब आरोग्य योजना व महाराष्ट्र कारागृह सुधारक सेवा बल कुटुंब आरोग्य योजना अशा योजनांचा समावेश असल्याची माहिती लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडून देण्यात आली.
माजी उपनगराध्यक्ष सी.पी. कांबळे, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल चव्हाण, सत्वशीला पाटील, संजय चव्हाण, शुभांगी साळुंखे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना विविध मान्यवर म्हणाले, लाइफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने उत्कृष्ट काम करत चांगली रुग्णसेवा केली आहे. कोरोना कालावधीमध्ये सामान्यांना आधार मिळेल अशी सेवा हॉस्पिटल कडून मिळाली. आपल्या कामातून तालुक्यामध्ये वेगळी ओळख निर्माण केल्याचेही उपस्थितानी सांगितले. यावेळी बोलताना डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर म्हणाले, हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून प्रामाणिकपणे सेवाभाव जपला जात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही योजना लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ.सुधाकर अलमद, डॉ. अनिकेत हजारे, प्रथमेश यादव, जहीर नदाफ, संतोष पाटील, प्रताप घाडगे, युवराज लुगडे, दादासाहेब गावडे, श्रद्धा खराडे, डॉ, विजय माने – पाटील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.