———————————–
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर लोंढे उप विभाग प्रमुख तुर्भे विभाग नवी मुंबई यांनी सांगितले की वाशी शिधावाटप कार्यालय ४/फ(उप) कार्यालयात जनतेला कामासाठी भरपूर चक्रा मारुन देखील अधिकारी कामे करत नाहीत, परंतु एजंटच्या माध्यमातून पैसे दिले की लगेच कामे होतात. या संदर्भात स्वता किशोर लोंढे यांनी अधिकारी छाया पालवे मॅडम सोबत चर्चा केली व सर्व प्रश्न सांगितले व आपल्या कार्यालयात जनतेची दिशाभूल व कामे होत नाहीत तेव्हा आपण बसलेल्या खुर्चीला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.
प्रश्न खालील प्रमाणे आहेत.
१) पालवे मॅडमची येणाऱ्या जनतेशी निट बोलत नाहीत.
२) या ठिकाणी वाढलेला एजंटचा वावर हा नेमका कोणामुळे वाढला आहे.
३) अधिकारी जनतेची कामे करत नसतील तर त्यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
४) खिडकी वर अधिकारी जनतेशी उद्धट पणे बोलतात.
तरी या प्रश्नावर काम करु तसेच समस्या असणाऱ्याने माझ्याशी संपर्क साधावा व मला भेटावे असे उत्तर छाया पालवे मॅडम यानी दिले.