साळुंखे महाविद्यालयाच्या आंतरवासितेत विविध स्पर्धा उत्साहात

जय – पराजयाची अनुभूती घेतल्यामुळे मानसिक आरोग्य सुदृढ होते : ए. एस. सावंत

सांगली/तासगाव : येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा शालेय आंतरवासिता उपक्रम ल.कि. हायस्कूल पलूस येथे सुरू असून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मेहंदी स्पर्धा, पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मिती स्पर्धा, पारंपरिक नृत्यगीते, झिम्मा, फुगड्यांचे विविध प्रकार, हँडबॉल स्पर्धा, हॉलीबॉल, कबड्डी अशा विविध खेळांचा समावेश होता.
या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री ए.एस. सावंत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारे फायदा होतो. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. जय-पराजय याची अनुभूती घेतल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ होते. शारीरिक तंदुरुस्ती बरोबर त्यांच्यामध्ये खेळाडूवृत्ती निर्माण होते. इतरांना सहकार्य करण्याची वृत्ती तसेच सहनशीलता निर्माण होते.”
सदर स्पर्धांच्या आयोजनाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. एम.पाटील, प्रा.ए.आर. पंडित, मुख्याध्यापक श्री ए.एस.सावंत व पर्यवेक्षिका सौ.यु.व्ही. पाटील यांनी केले. विविध स्पर्धांमधील प्रथम तीन क्रमांकांना प्रशिक्षणार्थीनींनी बक्षीसे व प्रमाणपत्रांचे करण्यात आले. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी अभिरुप मुख्याध्यापिका कु. वैशाली जगताप, प्रणाली मस्के, दामिनी आठवले, शिल्पा देशमुख, प्राजक्ता कोळेकर, स्नेहल गायकवाड यांनी परिश्रम घेतले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व प्रशासकीय सेवकांचे सहकार्य लाभले.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks