तनुश चिंदरकर याच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण व मुलांना दप्तर, पुस्तके वाटप
तनुश भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा सुपुत्र

सिंधुदुर्ग-विवेक परब- भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि चिंदर भटवाडी शाळेत कार्यरत शिक्षिका सौ. निशिगंधा वझे यांचा सुपुत्र तनुश यांचा वाढदिवस आज भटवाडी येथील अंगणवाडी शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अंगणवाडीतील मुलांना यावेळी दप्तरे आणि जि. प शाळेतील मुलांना मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी पुस्तके भेट देण्यात आली. तसेच शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच दिपक सुर्वे, संजय गांधी निराधार मालवण अध्यक्ष हडी गावचे माजी सरपंच महेश मांजरेकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, शिक्षक- रतन बूटे, निशिगंधा वझे, संदिप परब, धनजंय नाटेकर, अंगणवाडी सेविका सौ. साधना पाताडे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष महेंद्र कदम, मयु मसुरकर, अमृता तोरसोळकर, रोहिणी केळसकर, आरोग्य सेविका सरीता जंगले, समिर अपराज, समिर कांबळी, अनिता जाधव, झिला नार्वेकर आदी उपस्थित होते.