देशमुख महाविद्यालयात महसूल सप्ताह साजरा

देशमुख महाविद्यालयात महसूल सप्ताह साजरा

प्रतिनिधी - ब्रिटीश सरकारने भारतीय जनतेसाठी अनेक योजना राबविल्या असल्या तरी त्यातून भारतीयांची आर्थिक लूटच करण्यात आली स्वातंत्र्यानंतर सामुहिक विकासाची संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन तात्कालीन सरकारने ग्रामीण विकासासाठी महाराष्ट्रात अनेक योजना लोकाभिमुख आणि लोककल्याणकारी राबिवल्या आहेत त्याचात परिपाक आजच्या काळातील महसूल धोरणात दिसून येतो. असे प्रतिपादन अकोले तहसील कार्यालयाचे तहसीलदार तथा कार्यकारीदंडाधिकारी मा.सतीश थेटे यांनी केले. ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र महसूल विभागाच्यावतीने अॅड,एम.एन देशमुख महाविद्यालय आयोजित महसूल सप्ताहाच्या युवा संवाद या कार्यक्रमात बोलत होते. लोककल्याणकारी योजनांना आता ई-स्वरूप प्राप्त झाले असून वेळ व पैसा यांची बचत होऊन नागरिकांची ससेहोलपट बंद होईल असेही ते म्हणाले. हा कार्यक्रम महसूल विभाग अकोले, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग मंडळ, य.च.म.मुक्त विद्यापीठ केंद्र राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात राबविण्यात आला होता. यावेळी नवमतदार नोंदणी उपक्रमाची माहिती नोडल ऑफिसर डॉ. आर.आर.सोनावणे यांनी दिली.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील १३२ स्वयंसेवक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजूरचे कामगार तलाठी मा.अजय साळवे, मा.जंगले तात्या, सुनील भोत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. के. थोरात, हिंदी विभाग प्रमुख डॉ. बी. टी. शेणकर, प्रा.बी.एच.तेलोरे, प्रा. के. जे. काकडे, प्रा. टी. एच. सावंत, प्रा.अनिल आवारी, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एल.बी.काकडे यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.व्ही. एन. गिते यांनी मानले.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks