भारतीय मीडिया फाउंडेशन नाशिक जिल्हा कमेटी च्या वतीने मा. राज्यपाल यांना निवेदन

भारतीय मिडिया फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री. ए. के. बिंदूसार व मॅनेजिंग कमिटी यांचे सुचनेनूसार भारत देशाच्या सर्व राज्यांमध्ये दि. ०५नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या ऊदरनिर्वाहाच्या मूलभूत गरजा लक्षात घेता केंद्र सरकार व राज्य सरकार यांना निवेदनाद्वारे अवगत करण्याचे ठरविले. त्यानुसार भारतीय मिडिया फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री. ए. के. बिंदूसार यांचे सुचनेवरुन राज्य प्रभारी श्री. राजेंद्र वाघ यांचे मार्गदर्शनात महाराष्र्ट राज्य चेअरमन श्री.हिरालाल लोथे, जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप बारगजे यांनी खांदेश न्यूजचे संस्थापक-संपादक श्री. अविनाश पाटील यांचे समवेत राज्यातील सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या अधिकार, सन्मान, सुरक्षा, सुविधा संबंधीत अनेक मागण्यां संदर्भात आज दि. ०७/११/२०२२ रोजी महाराष्र्ट राज्याचे महामहिम राज्यपालांना जिल्हाधिकारी नाशिक यांचेमार्फत देण्यात आले निवेदन!