टेंभू अभियंता राजन रेड्डीयार यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करा
सांगली/कडेगाव :

टेंभू योजनेचे वरिष्ठ अभियंता राजन रेड्डीयार यांनी शेतकर्यांना खोटी लेखी आश्वासन देऊन फसवले याबाबत त्यांच्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करावा. याबाबत 30 मे रोजी 2025 रोजी पाणी संघर्ष समिती तर्फे पोलीस स्टेशनवर मोर्चा आंदोलन करणार असल्याचे जी डी बापू लाड यांची विचारधारा व वारसदर किरण तात्या लाड व पाणी संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष श्री डी. एस . देशमुख यांनी सांगितले.
त्यांच्या व पाणी संघर्ष समिती हस्ते कडेगाव प्रांताधिकारी रणजीतसिंह भोसले, तहसिलदार श्री अजित शेलार व पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात डी एस देशमुख यांनी म्हटले आहे की आम्ही 2018 पासून टेंभू योजनेचे पाणी मिळावे म्हणून पाणी संघर्ष समिती तर्फे उपोषण, रस्ता रोको, मोर्चा, जलसमाधी यासह अनेक आंदोलने करीत आलो आहोत. त्याबाबत टेंभू ऑफिस तर्फे फक्त लेखी खोटी आश्वासने कामे पूर्ण न करता दिली. ऑगस्ट 2024 रोजी टेंभू योजनेची अनेक कामे पूर्ण होण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो. टेंभू वरिष्ठ अभियंता राजन रेड्डीयार व मुख्य अभियंता गुनाले साहेब यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पाणी संघर्ष समिती तर्फे आंदोलन स्थगित केले होते. त्या लेखी पत्रात कडेगाव व गायकवाड तलावात, चांद सुर्वे तलावात बंदिस्त पाईप लाईन ने पाणी मिळेल व
सुर्ली व कामथी हे आवर्तन एकाच वेळी जादा अश्वशक्ती पंप वापरून सुरु करु ही कामे व बाकी कामे 2024 ते 2025 या प्राणपसूची मध्ये धरली आहेत व येत्या 2025 च्या उन्हाळी हंगामात या योजनेतून पाणी कडेगाव तलावात मिळेल असे लिहले होते . तसेच अनेक वेळा भेट घेतली असता कामे करू, होतील कामे असे खोटी आश्वासने राजन रेड्डीयार यांनी दिली . परंतु कोणतीही कामे सुरू झाली नाहीत,व शेतकर्यांची घोर फसवणूक झाली . टेंभू योजनेचे पाणी उन्हाळ्यात कडेगाव शहर भागात न मिळाल्याने पिके धोक्यात आली आहेत. शेतकर्यांच् आर्थिक नुकसान झाले आहे व होत आहे . टेंभू अभियंता राजन रेड्डीआर यांनी टेंभू योजनेची साडेतीन हजार कोटी रुपयांची कामे केलेली आहेत. अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहेत. यामधे भ्रष्टाचार झालेले दिसून येत आहे. तसेच राजन रेड्डीयार टेंभू अभियंता 8 वर्ष एकाच ठिकाणी का आहेत? यांचा आका कोण आहे.? तरी त्यांची निकृष्ट कामे व भ्रष्टाचार याची खातेनिहाय चौकशी करावी तसेच पाणी संघर्ष समिती व शेतकर्यांना लेखी खोटी आश्वासने गेली आठ वर्षे दिली तरी त्यांच्या वर सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा. यावर ही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला नाईलाजाने 5 जून 2025 रोजी लोकहितासाठी भूसमाधी घेण्याची परवानगी द्यावी .
तसेच कडेगाव तालुक्यात लाईट सारखी जाते. महावितरण कंपनीकडे गेले 40 वर्ष जुने डीपी वायर्स खांब आहेत ते नवीन बसवावेत. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत कडेगाव भागात तीन व्यक्ती विजेचा शॉक लागून मृत्यू मुखी पडली आहेत. त्याबाबत महावितरण कंपनी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यु वरूडे, पदाधिकारी सिराज पटेल, संजय तडसरे,जीवन करकटे,कुंडलिक एडके, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, पत्रकार संदेश जाधव,राजू घोडके, नवनाथ काकडे, सोमनाथ पवार, संजय मदने, नितीन मदने , भाऊसाहेब यादव, प्रविण करडे,आदि उपस्थित होते.