महिलांनी स्वतःच्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण करावी.
सतीश देशमुख.

सांगली /प्रतिनिधी.
आज संपूर्ण जगामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, यांच्याबरोबरच भारतासारख्या दैदिप्यमान राष्ट्राचे नेतृत्व इंदिरा गांधीनी केले तर सध्या भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मूर्म आहेत. महिलांचे समाजातील स्थान आदर्शवत असले पाहिजे विशेष शिक्षण क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा आदर्श निर्माण केला आहे, त्यामुळे महिलांनी स्वतःला कमी न समजता स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर स्वतःच्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण करावी असे प्रतिपादन कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख यांनी केले. ते कडेपूर ता.कडेगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामसचिवालय या ठिकाणी महिला प्रशिक्षण व उल्लेखनीय महिलांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य, लालासाहेब जाधव, माजी सभापती मंदाताई करांडे, संजय गांधी निराधार योजना सदस्य अनिता यादव, उपसरपंच वैभव यादव प्रमुख उपस्थित होते. यशदा पुणेचे प्रशिक्षक प्रशांत मून, शीतल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या वतीने कडेगाव तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ५० महिला बचत गट सदस्यांचा सन्मान करण्यात आला.या प्रशिक्षणाद्वारे महिलांचे हक्क, सक्षमीकरण आणि बालकल्याण विषयक माहिती देण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी उपसरपंच अनिल यादव, पतंग यादव, ग्राम. सदस्य हनुमान गरुड, दीपक परदेशी, विकास करकटे, वैशाली यादव, भारती यादव, लता यादव, अनुजा यादव, मीनाक्षी कोळी, सुनीता पिंगळे, उषा वाघमारे यांच्यासह सर्व ग्राम.सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
.