“आनंद शिधा” मिळाल्याने रेशनकार्ड धारकांची दिवाळी गोड होणार– चेअरमन सिताराम हडकर

श्री रामेश्वर विकास सेवा सोसायटीत चिंदरला पोहचला “आनंद शिधा”
सिंधुदुर्ग-विवेक परब श्री रामेश्वर विकास सेवा सोसायटी ली. चिंदर येथे आज 'आनंद शिधा'चे वाटप करण्यात आले. यावेळी चेअरमन सिताराम(देवेंद्र) हडकर, सोसायटी संचालक दिगंबर जाधव, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, गणेश पालकर, महादेव जाधव, दिलीप मेस्री, बाबा हडपी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, चेअरमन सिताराम(देवेंद्र) हडकर यांनी सांगितले की, 'आनंद शिधा'चे वाटप सर्व लाभ धारकांना करण्यात येणार आहे. दिवाळी सणात या शिधा वाटपामुळे मदत होणार असल्याने सर्वांची दिवाळी गोड होणार आहे.