राजुर चा नाशिक जिल्ह्यात समाविष्ट करण्यासाठी लवकरच मा. मुख्यमंत्री यांना देणार निवेदन – मा. सचिन मुतडक

राजुर चा नाशिक जिल्ह्यात समाविष्ट करण्यासाठी लवकरच मा. मुख्यमंत्री यांना देणार निवेदन – मा. सचिन मुतडक

राजुर चा विकास हाच आमचा ध्यास भारतीय मीडिया फाउंडेशन चा नारा

अहमदनगर राजुर-
अनेक वर्षापासून राजुर तालुका व्हावा हे राजूरकरांचे स्वप्न स्वप्नच राहते की काय.अशा अनेक समस्या राजूरकर यांच्या मनात व चर्चेत दिसून येतात. नेहमीच राजुर तालुका व्हावा अशी अफवा उठवली जाते. परंतु प्रत्यक्षात कृती करताना नावापुरती कृती केली जाते. लोकांना दाखवावं आणि नंतर ते पुसून टाकावं इतका सोपा विषय करून ठेवला आहे. राहता तालुका झाला तेव्हाच राजुर तालुका झाला असता. तर आज राजुरची बाजारपेठ व राजुर चे मार्केट वेगळंच असतं. परंतु या राजकारणी भांडणांमुळे हा राजुर तालुका होण्यापासून अनेक वर्षापासून वंचितच आहे. तसं पाहता राहता तालुक्यातील ग्रामपंचायत ची संख्या व अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत ची संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर विस्तार हा अकोला तालुक्याचा असून देखील व राजुरचा संपर्क जवळ जवळ चाळीस गावांशी असून, राजुर ही या गावांसाठी मुख्य बाजारपेठ आहे. परंतु एक दाखला जरी काढायचा असला, तरी अकोल्याला जावं लागतं. दुसऱ्या अडचणी असल्या तर अहमदनगरला जावे लागते. अहमदनगर जिल्हा जवळपास 185 (घाटघर ते नगर) किलोमीटर असल्याकारणाने एका दिवसात जाऊन येणे शक्य होत नाही. तरी आजूबाजूच्या खेड्यावरील लोकांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करत, नगरला असलेल्या कामासाठी आदल्या दिवशीच जावं लागतं. राजकारणी लोक फक्त नगर जिल्ह्याचा विभाजन व्हावं, आणि राजुर तालुका व्हावा, या अशा अपेक्षा अनेक वर्षापासून लोकांना दाखवतात, परंतु प्रत्यक्ष कृती होताना दिसत नाही. नुसते मेळावे घेऊन व दिखाव करून तालुका होत नसतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संघर्ष करून मंत्रिमंडळामध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींनी, आपल्या गावाची व्यथा मांडून, अनेक समस्या निदर्शनास आणून द्याव्या लागतात. व संघर्ष करावा लागतो. परंतु आज राजुर तालुक्याची फक्त अशाच दाखवली जाते. राजूर पासून संपर्कात असलेली अनेक पर्यटन स्थळ हे देखील या कारणामुळे प्रगतीपासून वंचित राहिली आहे. जर या पर्यटन स्थळांचा विकास योग्य पद्धतीने झाला असता, तर अनेक बेरोजगारांना रोजगार देखील उपलब्ध झाले असते. परंतु या पर्यटन स्थळांकडे देखील अहमदनगर जिल्ह्याचे पुढारी व राजकारणी लोकांचे पूर्णपणे दुर्लक्ष दिसून येते. आज चाळीस गावांना जोडणारे राजुर हे गाव तालुका झाला असता, त्यामुळे राजुर गावाचा विकास निश्चितच चांगल्या प्रकारे झाला व M I D C सुध्दा कार्यरत झालीअसती. परंतु नेमकं राजुर विषयी इतका तिरस्कार का..? हेच समजत नाही. तरी सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन. राजुर व राजूर ला जोडले गेलेली ही चाळीसगाव, मोठ्या प्रमाणावर असलेले हे पर्यटन स्थळे, ही जर नाशिक जिल्ह्याला जोडली तर राजुर तालुका होऊन. या भागातील सर्वसामान्य जनतेला नाशिक जिल्हा देखील अगदी जवळच्या अंतरावर असेल. व जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली कुठलीही कामे करून सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत घरी येणे सहजच शक्य होईल. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अकोले तालुका पूर्वीप्रमाणे नासिक ला जोडला पाहिजे आणि राजूर तालुका निर्मिती झाली तरच आदिवासी माणसाला न्याय मिळू शकतो व त्यामुळे राजुर गावचा विकास करणे अगदी सोप्प होऊन जाईल. व राजुर गावात सर्व शासकीय कार्यालय व कोर्ट येणे देखील सहज शक्य होईल. व आपल्या भागातील या सर्वसामान्य गोरगरीब जनतेची होणारी हेळसाड थांबेल. परिणामी या गावाचा विकास देखील झपाट्याने होऊन. सर्वसामान्य राजूरकरांना आपल्या हक्काचे राजुर घडवणं सहजच शक्य होईल.व आपल्या भागातील असलेली महत्त्वाची पर्यटन स्थळे यांचा देखील विकास करणे सोपे होईल. परिणामी जर या पर्यटन स्थळांचा विकास झाला तर येथील गोरगरीब सर्वसामान्य होतकरू मुलांना हाताला काम मिळेल. आज आपल्या भागातील मजदूर वर्ग मोठ्या प्रमाणावर ओतूर आळेफाटा इकडे कामाला जाताना दिसतो याच तरुनाना यथेच काम मिळेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर हाल होत असताना देखील या सर्वसामान्य जनतेची गरज प्रशासनाला व पुढाऱ्यांना का दिसत नाही. आज आपण पाहत आहोत कोल्हार घोटी रोड नुकताच नवीन तयार झाला असून देखील, त्याची झालेली दूर अवस्था ही नगर जिल्ह्यातील कार्यकारिणीला का दिसत नाही का..? अनेक खेड्यापाड्यावर जाणारे रस्ते हे वळणावळणाचे असून देखील, रस्त्यांची झालेली दुर्दशा ही पुढार्‍यांना का दिसत नाही का..? असे अनेक समस्या व प्रश्न कायमचे निकाली काढायचे असेल तर. राजुर हा भाग व आजूबाजूची ही चाळीसगाव जर नाशिक जिल्ह्याला जोडली तर नक्कीच या भागाचा विकास होईल. व गोरगरिबांचे प्रश्न देखील सुटतील. तरी सर्वसामान्य जनतेला आज आम्ही भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीने राजुर हे गाव नाशिक जिल्ह्यात समाविष्ट करून. राजूरकरांना व या भागातील चाळीसगावांना वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची संधी निर्माण करत आहोत. तरीही या गावातील व आजूबाजूच्या गावातील सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन, मोठ्या प्रमाणावर येत्या भविष्यकाळात आंदोलन करून. राजूर हे गाव नाशिक जिल्ह्यात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करू. लवकरात लवकर हा परिसर नाशिक जिल्ह्याला जोडण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मा. नामदार एकनाथ शिंदे साहेब व नगरविकास मंत्री, यांना भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीने निवेदन पाठवणार आहोत. तरीही या सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन, राजुर व या परिसरातील अनेक गावं नाशिक जिल्ह्यात समाविष्ट करण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारू. तसेच राजुर गावा‌ला एक नवीन ऊभारी देऊ.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks