
सांगली /तासगाव : तासगावच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कडून मुख्य बाजार आवारामध्ये स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम राबवून आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा करण्यात आला असून सरकार दिनानिमित्त स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त 1 जुलै ते 6 जुलै असा सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी स्वच्छता मोहीम तसेच वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले. तासगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग तासगाव, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मधील अधिकारी, कर्मचारी तसेच तासगाव परिसरातील शेतकरी, बाजार समिती मधील आडते, व्यापारी, खरेदीदार आदींनी मोठा सहभाग नोंदवला होता.