
महाराष्ट्र राज्यातील आध्यात्मिक व धार्मिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा एक सण म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी. ह्याच दिवसाचे औचित्य साधून ज्ञानविकास संस्थेच्या डी.व्ही.एस इंग्लिश स्कूल मध्ये विठ्ठल पालखीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता नर्सरी ते सातवीचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
सर्व प्रथम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अपर्णा पाटील मॅडम यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे व पालखीचे पुजन करण्यात आले. त्या नंतर त्यांनी एकादशीची समृद्ध परंपरा व चालीरीती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अनेक विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच अभंग गाऊन वातावरण विठ्ठलमय झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठलाची पालखी घेऊन दिंडी काढली.
विठ्ठल नामाचा गजर संपूर्ण विद्यालयात व विद्यार्थ्यांच्या मनात गजबजला.
महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा जपणे हे आपले कर्तव्य आहे.