
सांगली
कडेगांव येथे 186वर्षापुर्वी देशपांडे ईनामदार यांचे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर होते.परम भक्त श्री हरिबुवा माटे उर्फ राघवेंद्र स्वामी यांचे कडेगांव येथील वास्तव्यात केलेल्या रामायणावरील प्रवचने,आणि किर्तनातून ग्रामस्थाना रामकथेची गोडी लावली.या भागात रामनवमी उत्सव समर्थ सांप्रदाया प्रमाणे सुरू करावा अशी आग्रहाची मागणी ग्रामस्थांनी माटेबुवा यांचेकडे केल्यामुळे 186वर्षापुर्वी या उत्सवास प्रारंभ झाला.प्रतिपदे पासून दशमी पर्यंत व हनुमान जयंती या प्रत्येक वाराची तिथीची संपूर्ण दिवसाची व्यवस्था करण्याची शपथ घेतली व गेली 186वर्षे पिढ्यान पिढ्या त्याचे अखंड पालन होत आहे उत्सव मुर्ती घेऊन कडेगांव येथे येऊन उत्सव पार पाडण्याची जबाबदारी कै.रामकृष्ण माटे व त्यांचे शिष्य कै.पंडीतबुवा यांनी अनेक वर्षे सांभाळली आजही अभय माटे कुटुंबियांकडून पुण्याहुन उत्सवमूर्ती घेऊन येतात व ही परंपरा आनंदाने व निष्ठापूर्वक चालवित आहेत.
प्रतिपदा ते नवमी कार्यक्रमाशिवाय नवमीला दु.12वा.पुराणातील व नंतर किर्तनातील श्रीराम जन्मसोहळा,वसंतपुजा असा कार्यक्रम संपन्न झाला.दशमीला जय जय रघुवीर समर्थ हा जयघोष व समर्थांचे मनाचे श्लोक म्हणत शेकडो कुटुंबिय भक्तीभावाने भिक्षा समर्पण करतात.एकादशीला रथाची शोभा अपुर्व असते.186वर्षानंतर रथाचा जिर्णोध्दार करण्यात आला असल्यामुळे शिसवीच्या लाकडाच्या नक्षिदार अशा दोन मजली रथात रामपंचायतन विराजमान होते या वर्षी संपुर्ण कडेगांव शहरातुन भव्य मिरवणुक काढण्यात येणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी यांनी सांगितले. राम भक्तांना कडेगांव पलुस विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार माजी मंत्री डॉ.विश्वजित कदम,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,सोनहीरा सहकारी सुत गिरणी चे चेअरमन शांताराम बापु,कदम,सुरेशचंद्र निर्मळ थोरात,सुरेश दुबे नाना इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावूळी आमदार डॉ विश्वजित कदम यांनी रथगृहाच्या जिर्णोद्धारासाठी 10लाखाचा निधी माजी मंत्री स्व.डाॅ.पतंगराव कदम ट्रस्टच्या वतीने देण्याचे जाहीर केले आहे.
दुपारी लळीताचे किर्तन व वारवाले, मानकरी, सेवेकरी यांना खारिक खोबऱ्याचा प्रसाद रणभोर कुटुंबियाकडून दिला जातो.प्रतिपदेला आणलेली मुर्ती पुन्हा सवाद्य मिरवणुकीने देशपांडे कुटुंबियाकडे पोचविल्या नंतर उत्सवाची सांगता होते.