
महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा करण्यात येतो.त्याचेच औचित्य साधून ज्ञानविकास संस्थेचे डी.व्ही.एस.इंग्लिश स्कूलमध्ये महिलादिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या म्हणुन सौ. सुनीता चंद्रकांत पाटील मॅडम- अध्यक्षा वनिता महिला मंडळ, सौ.प्रेरणा पाटील मॅडम,सौ. सुवर्णा विद्यानंद पाटील मॅडम, सौ.भारती राम पाटील मॅडम, सौ.ज्योत्स्ना किशोर पाटील मॅडम, सौ.शालिनी रमेश वेटा मॅडम,सौ. शशी सेहगल मॅडम.सौ. शोभा पाटील मॅडम, सौ. निधी वर्मा मॅडम, श्री.जगन्नाथ दळवी सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अपर्ना पाटील यांनी आजचा दिवस हा जगातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान, कौतुक व प्रेम व्यक्त करण्याचा आहे.परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्री त्यावर मात करून पुढे जाऊ शकते.असे विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुनीता पाटील मॅडम व सौ. प्रेरणा पाटील मॅडम यांनी महिला सक्षम असून त्यांनी आपली ताकद ओळखली पाहिजे असे सांगून सर्व महिला पालकांना शुभेच्छा दिल्यात. सौ.शशी सेहगल यांनी महिलांसाठी छान, प्रेरक अशी कविता सादर केली.
तसेच महिला पालकांनी, शिक्षिकांनी,विद्यार्थ्यानी समुहनॄत्याद्वारे आपली कला सादर केली. कार्यक्रमाचा शेवट सर्व नृत्य, गायन सादर करणार्या कलाकारांना भेटवस्तू देऊन करण्यात आला. तसेच महिला पालकांनी आपली पाककला ही मांडली होती.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन श्री. दिनेश टोपले सर यांनी केले.