
सांगली/ तासगाव : जगभरात देशी गाईच्या सहवासाचे, दुधाचे, तुपाचे, शेणाचे, गोमुत्राचे महत्त्व पटू लागले आहे. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढुन कॅन्सर सारख्या दूर्धर रोगालाही रोखण्याची ताकद देशी गायीच्या वेगवेगळ्या पदार्थात आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंबाने देशी गाईंचे संगोपन करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन श्री संत सद्गुरु जगदीशमुनी बाग आश्रम वासुंबेचे प्रमुख डॉक्टर गणेश गांधले यांनी केले.
निमणी( ता. तासगाव) येथे आयोजित ग्रामपंचायत कार्यालय निमणी व गोवंश पालकांच्या वतीने देशी गाईंचा भव्य मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना माजी खासदार संजयकाका पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या दृष्टीने तसेच भावी पिढी सक्षम होण्यासाठी देशी गायीचे संगोपन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून डॉ. गांधले यांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्याचे रूपांतर चळवळीत होणे आवश्यक आहे.
सरपंच परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात अशा पद्धतीचे मेळावे घेण्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करू अशी ग्वाही पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीपकाका माने यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केले.
महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक आप्पासाहेब पाटील यांनी मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व गोवंश पालकांना धन्यवाद दिले.
मुख्य आयोजक रंगाआप्पा गायकवाड , पोपट आकाराम पाटील, माजी सरपंच विजय पाटील यांनी मेळावा यशस्वीरित्या आयोजित केला.
सहभागी झालेल्या सर्व गोमाता पालकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी निमणीच्या सरपंच सौ रेखा रविंद्र पाटील, तासगाव शहर शिवसेना पक्षप्रमुख विशाल शिंदे, बाळासाहेब पाटील, शिवाजी राजमाने, शिवाजीराव शिंदे, रावसाहेब पाटील, शरद पाटील,राजगोंडा पाटील, बाळासाहेब पाटील, गणपती पाटील, उदय पाटील, सचीन पाटील, बंडु पाटील,रमेश शिरदाळे, गणेश यादव, गजेंद्र मस्के, सुनिल शेळके, रामचंद्र शेळके, वरद माने , ज्ञानदेव पाटील , अशोक यादव, तुकाराम यादव, विष्णू भगवान मस्के, सोहेल नदाफ, धणेश देवकुळे, पिंटू कांबळे, आदींसह गोपालक उपस्थित होते.
सुत्रसंचलन व आभार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुधिर पाटील यांनी मानले.