वाशी पोस्ट ऑफीस म्हणजे मच्छर, डेंग्यू व मलेरियाचे घर



शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर लोंढे उप विभाग प्रमुख तुर्भे विभाग नवी मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार वाशी पोस्ट ऑफीस येथे येणाऱ्या नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. ऑफीस मधे अत्यंत अस्वच्छता असते तसेच संध्याकाळी ४:०० वाजे नंतर आतील खिडकी वर काम सुरू होते परंतु तेथे मच्छरांचे प्रमाण फार आहे त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना डेंग्यू, मलेरिया व इतर आजार होऊ शकतो. पावसापासून संरक्षण करण्यासाठी वरती छप्पर अथवा कोणत्याही प्रकारची सुविधा नाही.
तसेच किशोर लोंढे यांनी भहीरे सरांना देखील समस्या होत आहे हे सांगितले तेव्हा येथील मेन हेड अधिकारी आले तेव्हा त्यांना सुध्दा नागरिकांना होणाऱ्या समस्या सांगण्यात आल्या, तेव्हा लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले.
सोबत:- किशोर राठोड शाखाप्रमुख उपस्थित होते.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks