गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित

गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित

सिंधुदुर्ग(महाराष्ट्र)

नवी मुंबईतील कला साधना सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय गौरव पुरस्कार यंदा देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय अरुण मेस्त्री याला देण्यात आला. नवी मुंबईतील कामोठे येथे रविवारी झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार दिला गेला.
कला साधना सामाजिक संस्था दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते. अक्षय मेस्त्री हे आपल्या चित्रकारितेतून सामाजिक संदेश देण्याचा नेहमी प्रयत्न करतात. तसेच जखमी प्राणी-पक्ष्यांवर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात ते सुखरूप सोडतात, निसर्ग संवर्धनासाठी जनजागृती करतात. हे कार्य पाहता कला साधना सामाजिक संस्थेने राष्ट्रीय गौरव पुरस्कारासाठी अक्षय मेस्त्रीची निवड केली आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा नवी मुंबईतील कामोठे येथे रविवारी संपन्न झाला. या सोहळ्यात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय गौरव पुरस्कारासाठी देऊन गौरवण्यात आले. अक्षय मेस्त्री यांच्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रीय गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल अक्षय मेस्त्री याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks