अंनिस चा ‘आधार स्तंभ’ पुरस्कार अमर खोत यांना प्रदान

तासगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शतकवीर आणि आधारस्तंभ ‘कार्यकर्त्याचा सन्मान सोहळा ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक,वडघर जिल्हा रायगड येथे पार पडला. समितीचे क्रियाशील कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या आजवरच्या जडणघडणीत सक्रीय सहभागा विषयी आणि मासिकाच्या वाढीसाठी नेहमी प्रयत्नशील असल्याबद्दल कार्याची दखल घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा “आधारस्तंभ कार्यकर्ता”हा पुरस्कार तासगाव अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष अमर खोत यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथील सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊ सावंत, रायगड अंनिस चे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमुख पाहुणे -साहित्यिक राजीव तांबे, राजीव देशपांडे, मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण, राहुल थोरात (अंनिवा संपादक मंडळ) आणि प्रा. वासुदेव गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks