एस टी महामंडळाकडून पुणे विभागाला २१५नव्या गाड्यापुणेकरांना लालपरीकडून मोठा दिलासा.

एस टी महामंडळाकडून पुणे विभागाला २१५नव्या गाड्या
पुणेकरांना लालपरीकडून मोठा दिलासा.

सध्या सणासुधीचा काळ सुरू असल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढणार आहे .वाढत्या प्रवाशी संख्येमुळे बस नियोजनावर परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यातच महीला व जेष्ठनागरिकांना सवलती दिल्यामुळे महीला प्रवाशांची गर्दी वाढत आहे.दररोज निम्म्यापेक्षा जास्त महीला प्रवास करत आहेत महीला सन्मान योजना, अमृत जेष्ठ नागरिक योजनामुळे लालपरी (एसटी)ला प्रवाशांची जास्त पसंती वाढत आहे. त्यामुळे काही महीन्यातच प्रवाशांची दुप्पट संख्या वाढलेली आहे. त्यातुलनेत बसची संख्या अपुरी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने पुणे विभागाला२१५ नव्या गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आक्टोंबर महीन्यात म्हणजे दिवाळीच्या आधी एसटी च्या ताफ्यात या बस दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.पुणे विभागाकडे सध्या ८१५ बस गाड्या आहेत आता नव्या २१५ बसगाड्या दाखल झाल्यावर पुणे विभागाकडे एकुण बस गाड्यांची संख्या एकहजार तीस होणार आहे.या बस पुणे मुंबई व अन्य मार्गावर धावणार आहेत.त्यामुळे भागातील जीवनवाहिनी असलेल्या लालपरित एसटी महीला व जेष्ठ नागरिकांना प्रवास करण्यास सुखकर होणार आहे.अनेक गाड्यांचे आयुर्मान दहा वर्षापेक्षा जास्त झाल्याने त्या बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्वांचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे. परंतु आता नविन बस पुणे विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्यावर प्रवाशी सेवा सुधारणार आहे. प्रवाशी संख्येत वाढ झाली असली तरी बस अपुरी पडत आहे.यापुर्वी पुणे विभागातून ५० ते६०हजार प्रवाशी प्रवास करत होते यामध्ये ३०ते ४०हजार प्रवाशांची वाढ झाली आहे पुणे विभागात दररोज जवळपास एक लाख प्रवाशी वाहतुक होत आहे. यातून सुमारे १कोटी ३०ते ४०लाख इतका महसुल एसटी कडे जमा होत आहे.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks