राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्वराज्य फौंडेशनच्या खेळाडूंनी मारली मझल

सांगली/तासगांव – सांगली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात स्वराज्य फौंडेशनच्या खेळाडूंनी यशाची चौफेर फटकेबाजी करीत सांगली जिल्हा निवड चाचणीत अद्वितीय कामगिरी करीत यशाचा गौरव कलश आपल्या हाती घेतला. सांगली जिल्ह्यात स्वराज्य फौंडेशन एकमेव क्रीडा मंडळ ठरले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्वराज्य फाउंडेशनच्या खेळाडूंनी मझल मारली आहे. राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा दि.१९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२४ अखेर बालेवाडी पुणे येथे होणार आहेत. यामधे सहभागी खेळाडू पुढीप्रमाणे- १४ वर्षा खालील गट
राही सूर्यवंशी ग्रुप सी – प्रथम क्रमांक, सुहाना जमादार ग्रुप बी – प्रथम क्रमांक, युवराज कदम ग्रुप बी – तृतीय क्रमांक. १६ वर्षाखालील गट- वैष्णवी माने ६०० मीटर धावणे, पेंटॅथलॉन – प्रथम क्रमांक, वर्षा माने ८० मीटर अडथळा, उंच उडी – प्रथम क्रमांक, श्रावणी माने ६०० मीटर धावणे, लांब उडी – तृतीय क्रमांक, अथर्व पाटील ८० मीटर अडथळा, पेंटॅथलॉन – द्वितीय क्रमांक,अर्जुन लांडगे भालाफेक – तृतीय क्रमांक. १८ वर्षाखालील गट-अनुष्का चव्हाण ४०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक, लांब उडी- तृतीय क्रमांक,मुबसिरा मुल्ला ३ किमी चालणे – प्रथम क्रमांक, कमला चौधरी १ किमी धावणे – द्वितीय क्रमांक, आयुष्का धोत्रे – ४०० मीटर , १ किमी धावणे तृतीय क्रमांक. २० वर्षाखालील गट- सोफिया मुल्ला ५ किमी धावणे द्वितीय क्रमांक, १.५ किमी धावणे प्रथम क्रमांक.
खेळाडूंना प्रशिक्षक अंकुश कलकुटगी, फौंडेशनचे अध्यक्ष किरण माने, तालुका क्रीडा अधिकारी सौ. सीमा पाटील मॅडम ,वसंत थोरबोले, अभिजित कोळेकर, डॉ.सचिन सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.