
सांगली/तासगाव : तासगाव तालुक्यातील सर्वच गावात अतिवृष्टी झालेली आहे. परिणामी सर्वच खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. भुइमुग, उडीद, मुग, हुलगा,चवाळी, मटकी ,ज्वारी, मका, हाइब्रीड ज्वारी पीके बाधित झाली असून एक रुपयाचही उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे तासगाव तालुक्यातील सर्व गावांमधील पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशारा माजी सैनिक ज्योतिराम जाधव यांनी दिला.
तासगाव तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, ज्वारी, मका व हाइब्रीड ज्वारीचे नुकसान झालेने या वर्षी पशुचारा टंचाई निर्माण होणार आहे. सततच्या पावसामुळे काही शेतीमध्ये पेराच करता आलेला नाही. तालुक्यातील बऱ्याच द्राक्ष बागेत आजही पाणी व दलदल आहे त्यात धुके पडलेने औषध फवारनी करता आली नाही, पुर्ण पान गळ झालेली आहे या कारणास्तव २०२४/२५ द्राक्ष हंगाम वाया जाणार आहे. तरी द्राक्ष बागायतदार व द्राक्ष क्षेत्र जिवंत ठेवायच असेल तर एकरी किमान दोन लाख नुकसान भरपाई मिळावी. तसेच सर्वच क्षेत्राचे व पिकांचे तत्काळ पंचनामे करुन शेतक-यांना पिका नुसार व ज्या शेतक-यांच्या क्षेत्राचा पेराच झाला नाही त्यांना प्रति एकर नांगरट तीन हजार रु एक फन पाळी बाराशे रुपये, एक कुळव पाळी बाराशे रुपये नुकसानभरपाई दयावेत. या सर्व मागाण्यांचा विचार न झालेस बुधवार दि २५/९/२४ रोजी सकाळी ११ वाजले पासुन तासगाव तहसीलदार कार्यालय समोर शेतकऱ्या सोबत आमरण उपोषण करत असल्याचा इशारा माजी सैनिक जोतीराम जाधव व शेतकरी चळवळीतील नेते शशिकांत डांगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे, यावेळी अमोल कदम, उमेश गुजले, महादेव कदम, राम जाधव, मनोहर गायकवाड, मारुती देशमुख
हे शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.