
मुख्यमंत्री जन संपर्क कक्ष मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या तालुकास्तरीय सेतु केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या केंद्रामध्ये नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहे. याप्रसंगी बांधकाम कामगारांच्या सुविधेकरिता तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मंत्री सर्वश्री दादाजी भूसे, संजय राठोड, अतुल सावे, राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंघल, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार आदी उपस्थित होते.