चिंदर ग्रामपंचायत सेल्फी पाँईटचे भाजप नेते मंगेश गावकर यांच्या हस्ते लोकार्पण
चिंदर भगवती माऊलीचे डाँ निलेश राणे यांनी घेतले दर्शन

सिंधुदुर्ग-विवेक परब आई भगवती माऊली यात्रे निमित्त काल ग्रामपंचायत चिंदरच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. बहुचर्तीत व युवकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरलेल्या "चिंदर माझे सुंदर व चिंदर माझे गाव या सेल्फी पाँईंटचे
लोकार्पण भाजप नेते मंगेश गांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डाँ. निलेश राणे म्हणाले की चिंदर गावच्या लोकांनी मला खूप प्रेम दिले आहे. आपले प्रेम कायम माझ्यावर राहोत. आई भगवती माता कोकण प्रांतावर येणाऱ्या संकटापासून आपले सर्वांचे रक्षण करेल.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच सौ. स्वरा पालकर, उपसरपंच दिपक सुर्वै, देवस्थान कमिटी अध्यक्ष अरविंद घाडी, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, ग्रामपंंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, खरेदी विक्री संघ चेअरमन राजन गावकर, दत्ता वराडकर, कंटाळे, सुबोध गांवकर, ग्रामपंचाय सदस्य शशिकांत नाटेकर, प्रकाश तोंडवळकर, रवि घागरे, विशाल गोलतकर, सचिन हडकर आदी उपस्थित होते.