बेमुदत उपोषण बेमुदत उपोषण
प्रतिनिधी -:

अपंग जनता दल महाराष्ट्र राज्याचे उप-प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेब लांडे हे अपंगांच्या विविध मागण्या घेऊन कोपरगाव तहसील कार्यालयावर आमरण उपोषण करणार आहे
अपंग जनता दल चे उप-प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब लांडे यांच्या मागण्यांना शासनाने प्रतिसाद द्यावा. व उपोषण करते बाळासाहेब लांडे यांचे मनोबल वाढावे. यासाठी महाराष्ट्रातील तमाम सामाजिक संघटना, व महाराष्ट्रातील अपंग बंधू भगिनी यांनी त्यांना पाठिंबा द्यावा. व त्यांच्या उपोषणात सहभागी व्हावं. अशी अपेक्षा भारतीय जनता दल अहमदनगर जिल्ह्यातून चांगलाच जोर धरत असताना दिसून येत आहे. अपंगांवर होणारे अन्याय कधी थांबणार, आज या महाराष्ट्रामध्ये लाखो अपंग असे आहे की, त्यांचं दैनंदिन जीवन अतिशय अवघड असून, हे सरकार त्यांना अतिशय कमी मानधन देऊन जणूकाही अपंगांवर उपकारच करत आहे. या झोपलेल्या शासनाला जाग करण्याची वेळ आली असून, अपंगांना मिळणाऱ्या या मानधनामध्ये (5000) पाच हजार रुपयांपर्यंत वाढ व्हावी. यासाठी अपंग जनता दलचे महाराष्ट्र राज्याचे उप-प्रदेशाध्यक्ष कोपरगाव तहसील कार्यालयावर उपोषणासाठी बसून, अपंगांना न्याय मिळविण्यासाठी लढा लढण्याची सुरुवात करत आहे. त्यांच्या या मोलाच्या कार्यामध्ये आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलून सहभाग नोंदवावा.
उपोषणामधील खालील मागण्या
1). संजय गांधी व श्रावणबाळ पेन्शन योजनेत वाढ करून ती कमीत कमी पाच हजार रुपये करण्यात यावी.
2). अपंगांना स्वमालकीची जागा उपलब्ध नसल्यामुळे शासकीय घरकुलाचा लाभ दिला जात नाही तरी स्वमालकीची हक्काची जागा खरेदी करण्यासाठी तीन लाख रुपये अनुदान देण्यात यावे.
3). संजय गांधी पेन्शन योजनेचे पैसे दरमहा एक तारखेस अपंगांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात यावे.
4). अपंगांची दिवाळी दरवर्षी गोड व्हावी याकरता अपंगांना संजय गांधी पेन्शन योजनेप्रमाणे (10,000) दहा हजार रुपये बोनस भत्ता देण्यात यावा.
5). स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये नाम निर्देशन पत्र दाखल न करता त्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावे. तशा प्रकारचे प्रकारचा कायदा संसदेत आणावा.
या महाराष्ट्रामधील प्रशासन अपंग बंधू भगिनी कडे अजिबातच लक्ष देताना दिसत नाही. फक्त इलेक्शन आलं की त्यांच्या मतासाठी फक्त आश्वासन देतात, आणि त्यांचं काम झालं की सगळे विसरून जातात. आज अपंग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी सुद्धा 200 स्क्वेअर फुट जागा शासन देतं परंतु हे महाराष्ट्र सरकार अपंगांच्या विषयी अजिबातच संवेदनशील दिसत नाही. आजच्या या महागाईच्या काळामध्ये अपंगांना त्यांचं कुटुंब चालवणं देखील खूप जिकरीचं होत आहे. हाता पायाने अपंग असल्यावर कष्टही करू शकत नाही. अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये अनेक अपंग बांधवांची असून हे सरकार अपंगांची खरंच हेळसांड करतय ही हेंळसाड कुठेतरी थांबावी, यासाठी अपंग जनता दल महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. बाळासाहेब लांडे हे येत्या दि. 02/11/2023 दोन नोव्हेंबर पासून ते मुदत आमरण उपोषणासाठी कोपरगाव येथे तहसील कार्यालयासमोर बसणार आहे. तरीही या उपोषणामध्ये जास्तीत जास्त सामाजिक संघटनांनी व अपंग बंधू-भगिनींनी सहभाग घेऊन. बाळासाहेब लांडे यांची ताकद वाढवूया आपला अपंगांचा हक्क घेतल्याशिवाय राहायचं नाही. आपल्या प्रत्येक मताची किंमत ह्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना दाखवून देऊ. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची खूप गरज आहे. म्हणूनच आपल्या बाळासाहेब लांडे यांना सर्वांनी पाठिंबा देऊन त्यांच्या उपोषणाला उत्स्फूर्त पाठिंबा व सहभाग नोंदवा.
तमाम अपंग बंधू-भगिनींना नम्र विनंती पर आव्हान दोन नोव्हेंबर रोजी कोपरगाव तहसील कार्यालयावर श्री बाळासाहेब लांडे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा द्या जाहीर पाठिंबा द्या