घे भरारी फाऊंडेशन सावंतवाडी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर….!
ह्युमन राईट सावंतवाडी कार्याध्यक्षा सौ. मोहिनी मडगावंकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

ह्युमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या सावंतवाडी कार्याध्यक्षा तसेच “घे भरारी फाऊंडेशन,” सावंतवाडीच्या संस्थापक अध्यक्षा तथा “लायन्सस क्लब आँफ सावंतवाडी” सदस्या सौ. मोहिनी मडगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त घे भरारी फाऊंडेशन, सावंतवाडी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा – सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी २९/०९/२०२३ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत काॅटेज हाॅस्पिटल, सावंतवाडीच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन या दैवी कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.