
सिंधुदुर्ग-विवेक परब- कोकणात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाजप मालवण तालुकाध्यक्ष आपल्या टिम सह घरोघरी गणेश दर्शन घेत आहेत. पत्रकार विवेक(राजु) परब यांच्या निवास्थानी दर्शन घेण्यासाठी आलेल्या चिंदरकर यांचा परब कुटुंबीयानच्या वतीने कौटुंबिक सत्कार निवृत्त आयकर अधिकारी संतोष परब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी उद्योजक प्रकाश मेस्री, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, गणेश परब, सुभाष परब, श्रीकांत परब, निरंजन परब, मंथन परब, सुमित्रा परब, उषा परब, उमा परब, रेशमा परब, नम्रता परब, निकिता परब, दक्ष परब, उर्वी कुटुंबिय उपस्थित होते.