भारतीय मीडिया फाउंडेशन चे कृषी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मा. राजेंद्र वाघ यांना महाराष्ट्र राज्याचा राजश्री शाहू प्रेरणा कृषिरत्न 2023 पुरस्कार कोल्हापुरात प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी – दिनांक 6 / 9 / 2023 बुधवार रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पावन धरतीवर कोल्हापूर नगरीत दैनिक रोखठोक यांच्या व्यासपीठावरून भारतीय मीडिया फाउंडेशनचे किसान मजदूर पुरम कमिटीचे तसेच महाराष्ट्र राज्याचे मॅनेजिंग प्रभारी व महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ पत्रकार नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राजेंद्र जी वाघ यांना राजश्री शाहू महाराज यांच्या प्रेरणेने देण्यात येणारा महाराष्ट्र राज्याच्या कृषी रत्न पुरस्कार देण्यात आला.
सन्माननीय राजेंद्र जी वाघ गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून देशाच्या व राज्याच्या शेतकऱ्यांसाठी अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना मिळाव्या तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा 65 वयोगटातील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू व्हावी शेतकऱ्यांना मोफत रेशन धान्य योजना शेतकऱ्यांसाठी शिवार रस्ता मिळावा शेतकऱ्यांसाठी चांगल्या दर्जाचे बियाणे मिळावे तसेच चांगल्या दर्जाचे खते मिळावी अशा अनेक शेती फायद्याच्या बाबींवर ते गेल्या दहा पंधरा वर्षांपासून आंदोलीत होते व आहेत त्यांनी नुकतीच केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांसाठी प्रत्येक राज्यात सेपरेट असे कृषी मंत्रालय असावे व प्रत्येक जिल्ह्यात एक शेतकरी आमदार असावा या मंत्रालयात फक्त शेतकऱ्यांच्या विकासासाठी चिंतन व्हावे यासाठी या मंत्रालयाची देशाचे सन्माननीय पंतप्रधान व देशाचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे लिखित निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.
अशा या शेतकऱ्यांच्या नेत्याला महालक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने व राजश्री शाहू महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कोल्हापूर नगरीत मोठ्या थाटामाटात शाल नारळ सन्मानपत्र सन्मान मेडल सलमान टॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मराठी विश्वकोश महाराष्ट्र शासनाचे सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचा गुप्तचर विभागाची अधिकारी व भारताचे हिंदू रक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कृष्णदेवगिरी माननीय संजयजी शिंदे अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच माननीय सौ प्रीतम पाटील जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर तसेच माननीय सुरेश वाडकर मुख्य संपादक दैनिक रोखठोक व ज्येष्ठ साहित्यिक माननीय डॉक्टर सुरेश राठोड अध्यक्ष भारतीय पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा माननीय डॉक्टर सुशील अग्रवाल ज्येष्ठ पत्रकार व निवासी संपादक कोल्हापूर यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार.
याप्रसंगी भारतीय मीडिया फाउंडेशनचे माननीय बाळासाहेब झांबरे पाटील राष्ट्रीय अध्यक्ष सैनिक फोरम कमिटी भारत कोल्हापूरचे जेष्ठ पत्रकार प्रिंट येऊन इलेक्ट्रिक मीडियाचे महाराष्ट्र राज्याचे चेअरमन माननीय सलीम दादा शेख माननीय संदीपानजी शिंदे उपाध्यक्ष सैनिक फोरम कमिटी महाराष्ट्र राज्य माननीय विनायक जी सरोदे प्रदेश उपाध्यक्ष जनरल कमिटी महाराष्ट्र राज्य माननीय पांडुरंग भोसले जिल्हाध्यक्ष सांगली माननीय प्रकाशजी ठोंबरे तासगाव तालुका अध्यक्ष माननीय विजय भोसले कडेगाव तालुका अध्यक्ष माननीय बाळासाहेब सावंत कवठेमहाकाळ तालुका अध्यक्ष माननीय शिवाजी नाईक जत तालुका अध्यक्ष माननीय सतीश पाटील मिरज तालुकाध्यक्ष माननीय मारुती पाटील करवीर तालुका अध्यक्ष माननीयअर्जुन लिंगले सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय मोहन शिरवडे मिरज तालुका अध्यक्ष सैनिक फोरम कमिटी माननीय अरविंद शिंदे तासगाव तालुका अध्यक्ष सैनिक फॉर्म कमिटी माननीय अशोक शिंदे सांगली जिल्हा अध्यक्ष परिवहन फोरम कमिटी माननीय संभाजी लोंढे. उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे सन्माननीय राजेंद्र वाघ यांचे राज्यातील शेतकरी राज्यातील सैनिक राज्यातील पत्रकार व सर्व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.