उद्योजक तथा चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश मेस्री यांचा वाढदिवस बालकथाकन स्पर्धा व वृक्षारोपणाने साजरा

उद्योजक तथा चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश मेस्री यांचा वाढदिवस बालकथाकन स्पर्धा व वृक्षारोपणाने साजरा

सिंधुदुर्ग – विवेक परब- चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष तथा उद्योजक प्रकाश मेस्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रशाळा चिंदर नंबर १ येथे आज बालकथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या स्वागताने आणि दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी चिंदर गावाचे विविध क्षेत्रात नाव रोशन करणाऱ्या मुदूंगमणी तुषार हरिश्चंद्र परब, महिला मूर्तीकार पेंटर सुचिता संदिप परब, सर्पमित्र स्वप्निल सुर्यकांत गोसावी, रांगोळीकार विशाल सुरेश गोलतकर, उत्कृष्ट निवेदक भिमाशंकर बाबूराव शेतसंदी या पंचरत्नांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन गौरव " करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सरपंच दिपक सुर्वे म्हणाले की निर्भिडता आणि आत्मविश्वास वृध्दीगंत करा. तसेच केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, माजी सभापती हिमाली अमरे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनीही विचार मांडले. सरपंच दिपक सुर्वे, माजी सभापती हिमाली अमरे यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तीन गटात संपन्न झालेल्या बालकथाकथन स्पर्धेत पहिली दुसरी गटात रेणू भिमाशंकर शेतसंदी प्रथम, सृजन परेश चव्हाण व्दितीय तर विराज सचिन कांबळे याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तिसरी ते चौथी गटात यशश्री अमोल खेडकर प्रथम, अर्पिता भगवान पेडणेकर व्दितीय तर मिहिर मिलिंद चिंदरकर तृतीय क्रमांक प्राप्त केला. पाचवी ते सातवी गटात आर्यन संतोष अपराज प्रथम, अकिंत अमर खरात व्दितीय तर वेंदात आशिर्वाद तावडे याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, रिया घागरे, महेंद्र मांजरेकर, दुर्वा पडवळ, स्वरा पालकर, जेष्ठ नागरिक मधुकर(नारायण) पाताडे, पोलिस पाटिल दिनेश पाताडे, माजी सभापती हिमाली अमरे, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, चिंदर सेवा संघ खजिनदार गणेश गोगटे, सचिव सिध्देश गोलतकर, आशिष कोरगांवकर, भूषण दत्तदास, स्वप्निल गोसावी, मनवा चिंदरकर, बाळा परब, प्रिया पालकर, सर्व शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्तविक मोरेश्वर गोसावी यांनी तर सुत्रसंचालन भिमाशंकर शेतसंदी यांनी केली.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks