भारतीय मीडिया फाऊंडेशन सैनिक फोरम कमेटी सह महाराष्ट्र राज्यातील अनेक संघटना नी वन रैक वन पेन्संन साठी केले आंदोलन
देशाचे महामहीम राष्ट्रपती व मा. पंतप्रधान यांना सांगली जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत दिले निवेदन

सांगली महाराष्ट्र
केंद्र सरकारने देशातील सर्व माजी सैनिकांना वन रँक पेन्शन सुरू करावी. कारण देशाचा सैनिक हा सीमेवर रात्र दिवस उभा असतो. तेव्हा ही सर्वसामान्य जनता झोप घेऊ शकते. हा सैनिक स्वतःच घरदार मुलं बाळे सर्व सोडून या देशाच्या सर्वसामान्य जनतेसाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर रक्षणासाठी उभा असतो. तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या जीवाची परवा न करता देशाची सेवा करणे हे त्याचं आद्यकर्तव्य समजून, स्वतःचे घरदार सोडून सीमेवर कार्यरत असतो. रिटायर झालेल्या माजी सैनिकाला या देशात कधी सन्मान मिळणार. सगळ्यात महत्त्वाचं रिटायरमेंट नंतर या माझ्या सैनिकाला जो सन्मान मिळाला पाहिजे तो या भारत देशात मिळताना दिसत नाही. सर्वात पहिलं माझ्या सैनिकाला कुठल्याही अटी न टाकता प्रामुख्याने पेन्शन मिळालीच पाहिजे, कारण तो त्याचा हक्क आहे. या देशासाठी कधी कधी आपले हातपाय सुद्धा गमावलेले असताना अभिमानाने जगतो. परंतु तो जगण्यासाठी त्याला मरेपर्यंत पेन्शन योजना चालू व्हावी, अन्यथा याच्या भविष्य काळामध्ये माझ्या सैनिकाचा अपमान सहन केला जाणार नाही. त्याचा हक्क जर त्याला मिळाला नाही, तर दिल्ली येथे जंतर-मंतरवर भव्य मोठे जनआंदोलन छेडले जाईल. तेव्हा माझ्या भारत देशामध्ये माझ्या वीर जवान सैनिकाचा सन्मान हा झालाच पाहिजे. आणि त्याला जगण्यासाठी पेन्शन ही सुरू झालीच पाहिजे.
भारतीय मीडिया फाउंडेशन सैनिक फोरम श्री बालासाहेब झांबरे पाटील
राष्ट्रीय अध्यक्ष व महारष्ट्र राज्य उप अध्यक्ष श्री संदीपन शिंदे
सांगली जिल्हा अध्यक्ष श्री पांडुरंग भोसले
सांगली जिल्हा अध्यक्ष सांस्कृतिक फोरम श्री शहाजी भोसले. तासगाव तालुका अध्यक्ष श्री अरविंद शिंदे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.