महाराष्ट्र राज्य तैलीक महासभाचे जेष्ठ समाजिक कार्यकर्ते कै. बालाजी विष्णु चोथवे काळाच्या पडद्या आड

महाराष्ट्र राज्य तैलीक महासभाचे जेष्ठ समाजिक कार्यकर्ते कै. बालाजी विष्णु चोथवे काळाच्या पडद्या आड

सचिन मुतडक राजुर प्रतिनिधी

स्वर्गवासी बालाजी विष्णू चोथे यांची जीवन विषयी माहिती

राजुर येथील रहिवासी असलेले स्वर्गवासी बालाजी (अण्णा) विष्णू चोथवे हे आपल्यातून जाऊन आज दहा दिवस पूर्ण झाले आहेत आज त्यांच्या दशक्रिया विधी निमित्त आज त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार त्यांना शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आहे

बालाजी अण्णा हे जन्मापासून माळकरी होते त्यांनी वयाच्या बारा वर्षापासून त्यांना देवाची आवड होती त्यांनी आपल्या आईच्या हातून माळ घातली व त्या वर्षापासून पंढरपूर आळंदी पैठण देहू या तीर्थक्षेत्राची पायी दिंडीत वारी केली ती आजपर्यंत त्यांनी चालू ठेवली होती तसेच राजूर ते शनिशिंगणापूर ही पायी दिंडी तेलाची कवाड घेऊन पहिली सुरुवात राजुर येथून त्यांनी चालू केली त्यांच्या या दिंडीचे शनिशिंगणापूर येथे खूप मोठ्या प्रमाणावर स्वागत करून तेथील मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांना मानाचा फेटा श्रीफळ शाल देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या हातून शनि देवावर पूजाअर्चा करून तेलाचा अभिषेक केला जात होता तसेच त्यांनी जीवनात तेली समाज व इतर समाजात एकोपा ठेवण्याचं काम त्यांनी केले तेली समाजाचे दैवत संत जगनाडे महाराजांची जयंती पुण्यतिथी ची सूत्र सुरू करून राजूर गावात मोठ्या प्रमाणात समाज एकत्र करून गावात दिंडी मिरवणूक भंडारा करून संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्याचे मोठे श्रेय यांना जाते गावात कोणाचाही मृत्यू झाला तर ते जातीने हजर राहू पूर्णविधी करेपर्यंत तेथेच हजर असायचे ही एक मोठी आठवण राजूरकरांच्या मनात सोडून गेले अशा या महान नेतृत्वाचे प्रत्येक माणसाशी प्रेमाचे संबंध होते सर्व तेली समाज त्यांच्याकडे मोठ्या आशेने पहायचा अशा महान व्यक्तीमहत्त्वाला माझा तुमच्यावतीने अखेरची श्रद्धांजली अर्पण करतो.

भारतीय मीडिया फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. राजेंद्र वाघ यांचे ते सासरे होते तसेच महीला सेल फोरम कमेटी च्या महाराष्ट्र राज्य महासचिव सौ. भारतीताई वाघ यांचे ते वडील होते.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks